पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:44 AM2023-01-25T05:44:14+5:302023-01-25T05:44:29+5:30

पुस्तकात लपवून भारतात आणलेले तब्बल ९० हजार अमेरिकी डॉलर मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले

90 thousand dollars in the book also caught gold Action of Customs | पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई

पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई

googlenewsNext

मुंबई :

कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय पुस्तकात लपवून भारतात आणलेले तब्बल ९० हजार अमेरिकी डॉलर मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले आहेत. त्याची भारतीय चलनातील किंमत ८१ लाख रुपये इतकी आहे. 

सोमवारी पहाटे कस्टम विभागाने ही कारवाई केली असून, याप्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे.  कस्टम विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, भारतात येणाऱ्या एका परदेशी नागरिकाकडे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार संशयास्पद व्यक्तींची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी या व्यक्तीकडे दोन पुस्तकांच्या पानांमध्ये त्याने अमेरिकी डॉलरच्या नोटा लपविल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. 

Web Title: 90 thousand dollars in the book also caught gold Action of Customs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.