शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ९ किलो गांजा जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:48 IST

पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.  

मुंबई - भांडुपमधील वाढती गुन्हेगारी आणि त्याला संबंधित वाढती व्यसनाधीनता याविरोधात भांडुपवासीय एकवटले होते. त्यांनी याविरोधात जनआंदोलन छेडले होते. त्यामुळे कालच भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांचा पदावरून पायउतार झाला होता. याच पार्श्वभूमीवर ड्रॅग माफियांची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. या पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.  

भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी तोंड वर काढले होते. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईपोलिसांच्या अंमली पदार्थ विभाग (एएनसी)कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी रात्री भांडुप येथे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ तस्करांनाअटक केली असून त्यामध्ये एका ५० वर्षीय महिलेचा ही समावेश आहे. या तस्करांकडून ९ हजार ३०० किलोचा गांजा हस्तगत केला आहे. भांडुपच्या ३९१ बस स्टाॅप, किन्दी पाडा, भांडुप गावदेवी रोड, श्रीराम पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मुंबईच्या एएनसी पथकाला मिळाली होती. त्याच बरोबर नागरिकांच्या तक्रारी ही येत असल्याने पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने या भागात धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी विजय विष्णू पंडीत(२६), मुस्तफा शेख (२१), शक्ती पुजारा(३२), उत्तम कांबळे (४६), कमलेश गौतम (२६), साईपण सांगोली (२१) आणि जसुदा गायकवाड (५०) अशी या आरोपीची नावे आहेत. या सर्वांकडून पोलिसांनी ९ हजार ५०० किलोग्रॅम गांजा हस्तगत केला असून बाजारात त्याची किंमत १ लाख ८६ हजार इतकी आहे. या सर्वांविरोधात पोलिसांनी एडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक