शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील अनोळखी मैत्रिण पडली ८ लाखांना; गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2023 15:10 IST

याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोड - फेसबुकवर अनोळखी खातेधारक तरुणी सोबतची मैत्री मीरारोडच्या तरुणाला ८ लाख रुपयांना पडली. याप्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील स्वप्निल शांतीनगर इमारतीत इमॅन्युअल पिल्ले ( २९ ) हा तरुण आई सोबत राहतो . डिजिटल मार्केटिंग चा व्यवसाय करणाऱ्या पिल्लेची फेसबुक वर इंग्लंडची सांगणाऱ्या मीराबेला जेम्स नावाने असलेल्या कथित तरुणी सोबत झाली . तिने पिल्ले चा व्हॉट्सएप क्रमांक घेतल्यावर दोघांचे चॅटिंग सुरु झाले. 

जानेवारी २०२३ मध्ये तिने पिल्ले ला मॅसेज केला की, आपण इंग्लंडवरून दिल्ली आणि तेथून मुंबईत फिरण्यासाठी येणार आहे . दुसऱ्या दिवशी पिल्ले याला कॉल आला की तुमची मैत्रीण एअरपोर्टवर असून तिच्याजवळ ७० हजार पौंड  चा धनादेश असल्याने तिला सोडू शकत नाही. कस्टमर एक्साईज ड्युटीसाठी ५८ हजार आणि मनी लॉन्ड्री प्रमाणपत्र साठी ७४ हजार भरले तर सोडू. पिल्ले याने सांगितलेल्या युपीआय आयडी वर पैसे पाठवले. 

आयकर शुल्क, हॉटेल खर्च, रुग्णालय खर्च आदी विविध कारणांनी पिल्लेकडे पैश्यांची मागणी केली व पिल्ले ने त्या नुसार ऑनलाईन पैसे दिले . सातत्याने पैश्यांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पिल्ले याने सायबर शाखेत तक्रार केली. सायबर शाखेने तपास केला असता इस्लाम खान नावाच्या यूपीआय आयडीवर तसेच लक्ष्मीकांत नावाच्या व्यक्तीच्या खाते व युपीआय आयडी मध्ये एकूण ७ लाख ९९ हजार रुपये पिल्ले याने दिले होते. ८ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी २ ऑगस्ट रोजी नया नगर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीmira roadमीरा रोड