शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

खोट्या कागदपत्रांद्वारे ७७ वर्षीय वृद्धेची जमीन बळकावणाऱ्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:49 IST

Case filed against father son : भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे ह्या ७७ वर्षीय वृद्धेच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात मोरवा गावातील शागिर्द डेकोरेटर चे जगदेव व विमोग म्हात्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे अखेर या प्रकरणी चौकशीत तथ्य आढळून आल्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरा रोड - भाईंदरच्या मोरवा गावात असलेली ७७ वर्षीय वृद्ध महिलेची जमीन खोटी कागदपत्रे बनवून बळकावणाऱ्या बाप - लेका विरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेकोरेटर जगदेव म्हात्रे व त्याचा मुलगा विमोग हे दोघे आरोपी आहेत.

भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या जयश्री प्रभाकर म्हात्रे ह्या ७७ वर्षीय वृद्धेच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात मोरवा गावातील शागिर्द डेकोरेटर चे जगदेव व विमोग म्हात्रे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जयश्री यांची मोरवा गावात नवीन सर्वे क्र. ३/२६ ही सुमारे सव्वा तीन गुंठे इतकी  जमीन आहे. सदर जमिनीवर महापालिकेने नाट्यमंच बांधलेला आहे. पालिकेने कोणतीच परवानगी न घेता रंगमंच बांधला असल्याने तो पाडून टाकावा अशी तक्रार जयश्री यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये पालिका आयुक्तांना दिली होती.  त्यांच्या मुलांनी सातबारा ची माहिती घेतली असता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगदेव याने जयश्री व कुटुंबियांच्या २००० सालातील कुलमुखत्यार द्वारे ती जमीन मुलगा विमोग याला नोंदणीकृत करारनामा करून विक्री केल्याचे आढळून आले. 

माहिती अधिकारात सर्व कागदपत्रे घेतल्यावर जगदेव व विमोग यांनी बनावट कुलमुखत्यार पत्रद्वारे जमीन लाटल्याची तक्रार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी चौकशीत तथ्य आढळून आल्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जगदेव याचा डेकोरेटरचा मोठा व्यवसाय असून पोलीस, महापालिका व महसूल अधिकारी, राजकारणी आदींशी कामाच्या निमित्ताने  सलगी आहे. जगदेव याने सरकारी जमिनीवरील कांदळवन नष्ट करून कब्जा केल्याच्या तक्रारी देखील ग्रामस्थांनी सातत्याने चालवल्या आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदरbhayandarभाइंदरMuncipal Corporationनगर पालिका