शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपुरात ७४ लाखांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 11:32 PM

गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखा व एफडीएची कारवाई : दिल्लीहून गुटख्याची आवक

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

अजय मनोहरराव सोनटक्के (४०) हा एएमएस ट्रान्सपोर्टचा मालक असून महेंद्र रुकमपालसिंग बघेल, उत्तरप्रदेश असे कंटेनर ड्रायव्हरचे नाव आहे. या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये ५९ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ५५६४ किलो प्रीमियम पानमसाला (हॉट) आणि १४ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ७४२ किलो प्रीमियम च्युइंग टोबॅकोचा (एच५) समावेश आहे. अधिकाऱ्यांनी गोडाऊनला सील ठोकले.गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्त्वात अधिकारी व पोलिसांनी दुपारी ३.३० च्या सुमारास अमरावती रोड, वाडी येथील गुरुद्वारामागील एएमएस ट्रान्सपोर्टवर धाड टाकली. त्यावेळी दिल्ली नागपूर रोड लाईन्सचा अशोक लेलँड कंपनीच्या एमएच४०-बीएल २४२१ क्रमांकाच्या कंटेनरमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ट्रान्सपोर्टच्या गोडाउनमध्ये उतरविण्यात येत होता. अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून गुटखा जप्त केला आणि याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल इंगोले, हवालदार मनोजसिंग चव्हाण, हेड कॉन्स्टेबल प्रवीण फांदाडे, महिला पोलीस छाया राऊत, साधना चव्हाण, ड्रायव्हर प्रदीप समरीश आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, आनंद महाजन, प्रफुल्ल टोपले आणि नमूना सहायक अमित गवत्रे यांनी केली.पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री आणि वाहतुकीवर राज्य शासनाने प्रतिबंध लावला असला तरीही शहरात सर्वत्र सहजरित्या उपलब्ध होतो. नागपुरातील ३ हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्यांवर तंबाखूयुक्त खऱ्र्याची सर्रास विक्री करण्यात येते. विक्रेत्यांवर कारवाई करून पानटपऱ्या सील करण्याची नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :raidधाडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागPoliceपोलिसTobacco Banतंबाखू बंदी