शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:48 IST

Ahmedabad serial bomb blast decision : हा निकाल २ फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. मात्र अचानक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला.

२००८ साली अहमदाबाद शहर अवघ्या एक तासात तब्बल २१ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटाने हादरले होते. या प्रकरणी गुजरात न्यायालयाने ७७ पैकी ४९ आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर २८ जणांची निर्दोष सुटका केली आहे. उद्या गुजरात न्यायालयाकडून ४९ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. हा निकाल २ फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. मात्र अचानक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला.

हा साखळी बॉम्बस्फोट २६ जुलै २००८ रोजी घडला होता. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल २१ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात ५६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे एकत्रित करून एकच खटला भरवण्यात आला होता.

अहमदाबाद बॉम्बस्फोट टाइमलाइन

• गोध्राकांडनंतर झालेल्या दंगलीचा बदला घेण्याचा कट होता• वाघमोर जंगलात स्फोटासाठी प्रशिक्षित• दहशतवाद्यांचे एक पथक रेल्वेने अहमदाबादला पोहोचले• मुंबईहून कारमध्ये स्फोटके आणली होती• कारने अहमदाबाद आणि सुरतपर्यंत स्फोट झाले• 13 सायकल खरेदी केल्या आणि स्थानिक स्लीपर सेल वापरले• मुफ्ती अबू बशीर यांनी स्लीपर सेल तयार केला होता• ८२ दहशतवाद्यांना पकडण्यात आले• ३ दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले• ३ दहशतवादी वेगवेगळ्या राज्यात शिक्षा भोगत आहेत• १ आरोपी सीरियाला पळून गेला• चकमकीत १ आरोपी मारला गेला

या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अहमदाबादला भेट दिली होती. या भेटीनंतर २८ जुलै रोजी गुजरात पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पोलीस पथकाने अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना मिळत गेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या (IM) दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांच्या शोधात होते.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. मात्र, टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे  स्फोट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ७७ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४९ जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी दोषी आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

 

 

टॅग्स :Bombsस्फोटकेBlastस्फोटahmedabadअहमदाबादCourtन्यायालय