शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला ७ वर्षे तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:43 IST

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणा-याला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.

पुणे -  घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करणाºयाला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.गुलाब लालमा पठाण (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १० आॅक्टोबर २०१४ रोजी कोंढवा परिसरात घडली होती.घटनेच्या दिवशी पीडितेची आई सोलापूरला गेली होती. तर, भाऊ कामाला गेले होते. त्यामुळे पीडित मुलगी घरात एकटीच होती. त्याचा फायदा घेत पठाण दुपारी दोनच्या सुमारास तिच्या घरात घुसला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री १० वाजता पीडिता गरोदर राहू नये, यासाठी तिला गोळी देण्यासाठी गेला होता.याबाबत तिने घराच्या मालकिणीला सांगितले. तिच्या सांगण्यावरून रात्री ११ वाजता पीडितेच्या दोन्ही भावांना हा प्रकार समजला. दोघे भाऊ पठाण याला जाब विचारण्यास गेले. त्या वेळी त्यांच्यात भांडण झाले.तिच्या भावांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तर पठाण याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अंजूम कासम बागवान यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार संतोष अंगणे आणि पोलीस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.दंडाच्या रकमेपैकी ५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावेत.दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी कामपाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेचा जबाब आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग