शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:50 IST

घातक शस्त्रे, मिरची पुड, दोरी, बॅटरी, मोबाईल फोन व मोटारसायकल असा ५ लाख ८४ हजार ५२० रुपयांचा माल जप्त

ठळक मुद्देअधिक तपासासाठी २ दिवस पोलीस कोठडी मंजूर

पुणे : नर्‍हे येथे दरोड्याच्या तयारीने एकत्र आलेल्या ७ जणांच्या टोळक्याला सिंहगड रोड पोलिसांनीअटक केली आहे. रोहित प्रकाश पोकळे (वय २८, रा. गणेश पेठ), अमित धनंजय बोराटे (वय २५, रा. गुरुवार पेठ), भूषण रमेश मोहिते (वय ३७, रा. बेनकर वस्ती, धायरी) संदीप संजय दुबे (वय २५, रा. शुक्रवार पेठ), शुभम राजेश पवार (वय २५, रा. गणेश पेठ), सागर बाळासाहेब टिळेकर (वय २३, रा. गंज पेठ), अभिषेक संतोष पन्हाळे (वय २१, रा. गंज पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई धायरी रोडवरील नर्‍हे येथील ऑपलोन्स सोसायटीसमोर सोमवारी रात्री दीड वाजता करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन तनपुरे यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व जण धायरी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीनुसार एकत्र आले होते. त्यांनी तेथून जाणार्‍या एका टेम्पोचालकाला मारहाण करुन लुटले होते. याची माहिती मिळाल्यावर सिंहगड रोड पोलिसांनी रात्री सापळा रचला. या टोळक्याला पकडले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे, मिरची पुड, दोरी, बॅटरी, मोबाईल फोन व मोटारसायकल असा ५ लाख ८४ हजार ५२० रुपयांचा माल जप्त केला आहे.या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने अधिक तपासासाठी २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिस