शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

माले मुडशिंगी येथून ६९ गावठी बॉम्ब जप्त, दोन सख्खे भाऊ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 22:37 IST

उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले.

कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले. संशयित विलास राजाराम जाधव (वय ५२ ) व आनंदा राजाराम जाधव ( ५४) यांना अटक केली. बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेले साहित्य कोठुन आनले तसेच त्याचा वापर कोठे झाला, त्याची विक्री कोणाला केली. उजळाईवाडी स्फोटासंबधी यांचा काही संबध आहे काय, याबाबत चौकशी सुरु आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. संशयितांनी भूईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो. शेतक-यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. त्यांनी स्फोटके ठेवली होती की ज्यांना विक्री केली त्यांनी ठेवली होती, याबाबत चौकशी सुरु असलेचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले. उजळाईवाडी स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा हकनाक बळी गेला आहे. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने, हरिष पाटील यांना खब-याकडून माहिती मिळाली की, माले मुडशिंगी येथील विलास जाधव व आनंदा जाधव हे गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करतात. त्यांना ताब्यात घेवून दोघांच्या घराची झडती घेतली असता बॉम्ब बनविण्याचे साहित्यासह पांढºया व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ गावठी तयार बॉम्ब असा सुमारे ७ हजार किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोर्टशियम पावडर, गारगोटीचे खडे आदी साहित्य वापरुन गावठी बॉम्ब बनवित असलेची कबुली दिली. बॉम्बला रक्तीच्या आवरणाचा वापर करुन रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याचा वापर करीत असल्याचे सांगितले.उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य अशाचप्रकारे आहे. त्यांचेकडून या साहित्याची विक्री झालेची शक्यता आहे. त्यांनी हे साहित्य उड्डाणपुलाखाली ठेवले होते की अन्य कोणी याबाबत त्यांचेकडे चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBombsस्फोटकेkolhapurकोल्हापूर