शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अबब... पोटातून निघाल्या कोकेनने भरलेल्या ६० कॅप्सूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 18:00 IST

मुंबई विमानतळावरून व्हेनेझुएलाच्या तस्कराला अटक

ठळक मुद्देया प्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. मुंबई विमानतळावरून १० दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेलाही कोकेन तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (२७) असं या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलन तस्कराचं नाव आहे.

मुंबई -  अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) विमानतळावर बेड्या ठोकलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकाने चक्क कोकेनच्या ६० कॅप्सूल गिळल्याचे एक्‍सरे तपासणीतून उघड झाले होते. त्यानंतर जे. जे. रुग्णालयात सहा दिवसांत त्याच्या पोटातून ६० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या प्रकरणात ब्राझीलमधील नायजेरियन तस्कराचा हात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर व्हेनेझुएलन नागरिकाला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.डेमनाईस मिगुईल टोवर सेल्स (२७) असं या दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलन तस्कराचं नाव आहे. याच्या पोटातून कोकेनच्या ६० कॅप्सूल काढण्यात आल्या. त्याला एआययूच्या पथकाने १९ जुलैला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्याजवळील सर्व बॅगा आणि इतर साहित्याच्या तपासणीत काहीच सापडले नव्हते. मात्र, एक्‍सरे तपासणीत त्याच्या पोटात कॅप्सूल असल्याचे आढळून आले. नंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्‍टरांनी एनिमा देऊन या तस्कराच्या पोटातून सर्व कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यासाठी डॉक्‍टरांना सहा दिवस उपचार करावे लागले.जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पहिल्यांदा २१ जुलैला सेल्सच्या पोटातून १४ कॅप्सूल बाहेर काढल्या. त्यानंतर सहा दिवसांत थोड्या-थोड्या अशा ६० कॅप्सूल काढण्यात आल्या. या कॅप्सूलमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली होती. त्याच्या पोटातील कॅप्सूलमधून मिळालेल्या सुमारे ६५० ग्रॅम कोकेनची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या व्हेनेझुएलन नागरिकाने इंग्रजी भाषा येत नसल्याचा दावा केल्यामुळे चौकशीसाठी ती भाषा येत असलेल्या व्यक्तीची मदत घेण्यात येत आहे. हे कोकेन तो मुंबईत कोणाला देणार होता याचा तपास सुरू आहे. चौकशीत या तस्करीचे धागेदोरे ब्राझीलपर्यंत पोहोचले आहेत. तेथील पॅट्रिक या नायजेरियन तस्कराने हे अमली पदार्थ दिल्याचे त्याने सांगितले. या तस्करीसाठी त्याला ३ हजार अमेरिकन डॉलर मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच तो पकडला गेला. डॉक्‍टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबई विमानतळावरून १० दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेलाही कोकेन तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. तिच्या देखील पोटात २४ कोटी रुपयांच्या कोकेनच्या कॅप्सूल सापडल्या होत्या.

टॅग्स :Air Intelligence Unitएअर इंटेलिजन्स युनिटAirportविमानतळArrestअटकDrugsअमली पदार्थJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय