शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात ६ कोटींचे कोकेन! मुंबई विमानतळावर व्हेनेझुएलाच्या नागरिकाला अटक, डीआरआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:10 IST

डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला येथून एक व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करत ते मुंबईत आणत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मुंबई : परदेशातून अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जातात. शरीरामध्ये तब्बल सहा कोटी २० लाख रुपयांचे कोकेन लपवत त्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे. तो व्हेनेझुएला देशाचा नागरिक असून अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाच्या अनुमतीने त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला येथून एक व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करत ते मुंबईत आणत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ती व्यक्ती मुंबईत येत असलेल्या विमानाच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. विमानातून उतरलेल्या एका व्यक्तीचा हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याला बाजूला घेण्यात आले. सर्वप्रथम त्याच्या सामानाची झडती घेतली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले नाही.

शस्त्रक्रिया करून काढल्या ५७ कॅप्सूल     चौकशीदरम्यान त्याने स्वत:च्या शरीरात कोकेनच्या ५७ कॅप्सूल लपविल्या असल्याची कबुली दिली.      रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या शरीरातून या कोकेनच्या कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या.      या कोकेनचे वजन ६२८ ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सहा कोटी २० लाख रुपये इतकी आहे.      अटक केलेली व्यक्ती केवळ हँडलर आहे की, त्याच्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, तसेच मुंबईत तो हे कोकेन कुणाला देणार होता, याचा तपास अधिकारी करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी