शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वेश्याव्यवसायासाठी ५४१ महिलांची तस्करी; गेल्या वर्षभरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 07:44 IST

तस्करीचे गुन्हे मात्र घटले. सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी.

ठळक मुद्दे तस्करीचे गुन्हे मात्र घटले.सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी

मनीषा म्हात्रेमुंबई : चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाबरोबरच सध्या हिंदी चित्रपट, मालिका, जाहिराती, वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून मुलींची मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसायासाठी तस्करी केली जात आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी राज्यातून ६० अल्पवयीन मुलींसह ५५१ महिलांची सुटका करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे ५४१ जणींची वेश्याव्यवसायासाठी तस्करी केल्याचे समोर आले आहे. 

एनसीआरबीने २०२० च्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मानवी तस्करीचे १ हजार ६५१ गुन्हे दाखल झाले असून, यात ४ हजार ७०९ मुली आणि तरुणींचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे मानवी तस्करीत महाराष्ट्रातून सर्वाधिक म्हणजे ४४ अल्पवयीन मुलींसह ५५० महिलांची तस्करी केल्याची नोंद आहे. तर, विविध कारवाईतून सुमारे ५५१ जणींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये ५२१ भारतीय महिलांसह ४ नेपाळ, १६ बांगलादेशी तरुणींचा समावेश आहे. यात वेश्याव्यवसायासाठी ५४१ जणांची तस्करी केल्याची माहितीही समोर आली आहे. 

कुंटणखान्यापासून सुरू झालेले सेक्स रॅकेट बॉलिवूडपर्यंत पसरल्याचे गुन्हे शाखेने वेळोवेळी केलेल्या कारवाईतून समोर येत आहे. देश-विदेशासह भारतातील खेड्यापाड्यातून अनेक तरुणी मायानगरी मुंबईतील बॉलिवूडच्या झगमगत्या चंदेरी दुनियेचे आकर्षण, मॉडेलिंग क्षेत्रात करिअर, अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतात खऱ्या. पण यामागचे वास्तव या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर समोर येते. यात नवोदित कलाकार सॉफ्ट टार्गेट ठरताना दिसून येत आहेत. मुंबईत स्वत:ची  वेगळी ओळख निर्माण करण्याच्या नादात या तरुणी सेक्स रॅकेटच्या जाळ्यात अस्तित्वच हरवून जात आहेत. त्याचाच फायदा दलाल मंडळी उठविताना दिसत आहेत. हायप्रोफाईल राहणीमान सांभाळत, स्वतःचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी नाईलाजास्तव किंवा स्वेच्छेने त्या वेश्याव्यवसायात अडकत आहेत. 

महाराष्ट्रासोबत तेलंगणची आघाडीगेल्या दोन वर्षात मानवी तस्करीच्या दाखल गुन्ह्यात घट झाली आहे. २०१८ मध्ये ३११ वर असलेला आकडा २०२० मध्ये १८४ वर आला आहे. मानवी तस्करीच्या दाखल गुन्ह्यात महाराष्ट्राबरोबर तेलंगणा(१८४) ची आघाडी कायम आहे. 

वेळीच सतर्क व्हा...मुलींनी कुठल्याही फसव्या आमिषांना बळी पडू नये. तसेच ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करणे आवश्यक आहे. पालकांनीही आपली मुलगी काय करते, याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणाMONEYपैसाWebseriesवेबसीरिज