शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नवी मुंबईत वर्षभरात 5,332 जणांनी खाल्ली ‘कोठडीची हवा’, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 00:56 IST

Crime News : पोलिसांनी वर्षभरात विविध गुन्ह्यांत एकूण ५३३२ जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना खारघर पोलिसांकडून अटक झाली आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलिसांनी वर्षभरात विविध गुन्ह्यांत एकूण ५३३२ जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना खारघर पोलिसांकडून अटक झाली आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यात सराईत गुन्हेगारांकडून नियोजनबद्ध केले जाणारे गुन्हे तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ऐनवेळी घडलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा गुन्ह्यांची उकल करून दोषींना अटक करण्यासाठी पोलिसांना कौशल्य पणाला लावावे लागते. त्यानुसार मागील वर्षभरात घडलेल्या अशा अनेक गुन्ह्यांत पोलिसांनी कामगिरी सिद्ध करून दाखविली आहे. त्यानुसार वर्षभरात विविध गुन्ह्यांतील तब्बल ५ हजार ३३२ जणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. त्यात काही जुन्या गुन्ह्यांतील आरोपींचाही  समावेश आहे. पोलिसांकडून तपासात राहिलेल्या सातत्यामुळे गतवर्षात ते पोलिसांच्या हाती लागले आहेत.गतवर्षात परिमंडळ एक मध्ये २ हजार ४२४ आरोपींना, तर परिमंडळ दोनमध्ये २ हजार ९०८ आरोपींना अटक झाली आहे. त्यात सर्वाधिक ६१४ जणांना खारघर पोलिसांनी कोठडी दाखविली आहे.लॉकडाऊनदरम्यान मे ते जुलैचा कालावधीत केवळ काही प्रमाणात आरोपींची पकड ढिली झाली होती. संशयित आरोपी पकडताना त्याला कोरोनाची लागण नाही ना ? याची चिंता पोलिसांना होती. तर एपीएमसी पोलिसांनी पकडलेल्या एकाला कोरोना झाला असल्याचे त्याला कोठडीत डांबल्यानंतर समोर आले होते. त्यामुळे या कालावधीत आरोपींची धरपकड काही प्रमाणात मंदावली होती. मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या व जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर जोर देत आरोपी अटकेवर भर दिला. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, हत्या, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अधिकाधिक गुन्हेगार अटक करून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला आहे. 

ऑगस्टनंतर पुन्हा पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या व जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर जोर देत आरोपी अटकेवर भर दिला. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, हत्या, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी