शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 18:35 IST

- मंगेश कराळे नालासोपारा :- शहरातील पूर्वेकडील परिसरात मंगळवारी रात्री  ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन या अंमली पदार्थांसह आरोपीला अटक करण्यात ...

- मंगेश कराळे

नालासोपारा :- शहरातील पूर्वेकडील परिसरात मंगळवारी रात्री  ५५ लाखांचे ५१० ग्रॅम हेरॉईन या अंमली पदार्थांसह आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. यापूर्वीही अनेक वेळा नालासोपारा शहरात अंमली पदार्थ सापडले आहेत.

मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री व तस्करी करणाऱ्यांनाविरुध्द कडक कारवाई करुन पायबंद करणे बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष- ३ विरारचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे रोड, फायरब्रिगेड जवळील रोडवर आरोपी संजय विश्वकर्मा (२८) याला ताब्यात घेऊन झडती घेतली. आरोपीकडून त्याचे कब्जात ५१० ग्रॅम वजनाचे ५५ लाख रुपये किंमतीची हेरॉईन नावाचा अंमली पदार्थाची हलक्या चॉकलेटी रंगाची पावडर तस्करी करीत असतांना मिळुन आला आहे. आरोपी विरुध्द आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

१) आरोपीला अटक करून चौकशी व तपासासाठी आचोळे पोलीस ठाण्यात दिले आहे. आरोपीला बुधवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - प्रमोद बडाख (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट तीन)

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस