शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांविरुद्ध ५०० फौजदारी खटले; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 07:45 IST

खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या ५०० प्रकरणांपैकी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ४५ तर परभणी येथे ४० फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. लातूर जिल्ह्यात एक प्रकरण प्रलंबित आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र व गोव्यात खासदार व आमदारांविरोधात  वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील न्यायालयात ५०० पेक्षा अधिक फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. यात अमरावती जिल्ह्यात खासदार व आमदारांविरोधात सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. तर नक्षली भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात एकही प्रकरण प्रलंबित नसल्याचे उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. 

खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेल्या ५०० प्रकरणांपैकी महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये ४५ तर परभणी येथे ४० फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत. लातूर जिल्ह्यात एक प्रकरण प्रलंबित आहे. 

खासदार व आमदारांविरोधात प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष न्यायालय स्थापण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयाला दिली. त्यानुसार, उच्च न्यायालयाने यासंदर्भात जनहित याचिका दाखल करून घेतली. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याच्या मुख्य न्यायाधीशांना अशा प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यास सांगितले होते. शुक्रवारच्या सुनावणीत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काहीअंशी पालन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. त्यावर न्यायालयाने आतापर्यंत किती खटल्यांना स्थगिती देण्यात आली आहे, याची यादी उच्च न्यायालयाच्या निबंधकांना सोमवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले. 

n आमदार व खासदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात २०१ खटले प्रलंबित.n नागपूर खंडपीठ १२६, औरंगाबाद खंडपीठ १५७ आणि गोवा खंडपीठात २० प्रकरणे प्रलंबित.

फौजदारी प्रलंबित असलेल्या नेत्यांची नावेनीतेश राणे, अबू आझमी, एकनाथ खडसे, सुभाष देशमुख, पंकज भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, बच्चू कडू, संजय धोत्रे, सुनील केदार, राधाकृष्ण विखे-पाटील, अनिल गोटे व हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे.

टॅग्स :MLAआमदारNitesh Raneनीतेश राणे Abu Azmiअबू आझमीeknath khadseएकनाथ खडसे