शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली नेत्याला 50 लाखांना लुटलं; 22 वर्षीय आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 13:58 IST

कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

नवी दिल्ली: दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार ठगांना अटक केली आहे. यांनी एका बड्या नेत्याला 2024 मध्ये लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाख रुपयांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बड्या अधिकार्‍यांव्यतिरिक्त, राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या नंबरवरुन स्पूफिंगद्वारे कॉल करायचे.

आरोपींनी यासाठी स्पूफिंग अॅपचा वापर केला. आधी ते बड्या अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे मोबाइल नंबर काढायचे आणि नंतर मुख्यमंत्री कार्यालयाचा नंबर काढून अॅपच्या माध्यमातून त्यांना फोन करायचे. समोरच्या व्यक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाचा नंबर दिसायचा. अशाच प्रकारे एका नेत्याला विश्वासात घेऊन आरोपींनी 50 लाख रुपयांना लुटलं. नेत्याकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी ते पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये बदलले आणि नंतर आपल्या व्हॉलेटमध्ये सेव्ह केले. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या व्हॉलेटमध्ये US$ 59,000 आढळून आले आहेत. 

असा झाला खुलासाकाही दिवसांपूर्वी आरोपींनी एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन तीन बदल्या झाल्याची माहिती दिली, पण आयपीएस अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी चौकशी केली. हा फोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आला नसल्याचे त्यांना समजले. यानंतर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणी आयटी कायद्याच्या कलम 66 सी, गुन्हेगारी कटाच्या कलम 120 ब यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर 22 वर्षीय हिमांशू सिंग, जस्टिन मोहनलाल परेरा, दशरथ मकवाना आणि लखनऊ येथील नरेश कुमार यांना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीdelhiदिल्लीPoliceपोलिसlok sabhaलोकसभा