शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, अलिबागची घटना, खंडणीचा गुन्हा झाला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:21 IST

Crime News : लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

रायगड : अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून पोलीस हवालदाराला धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी  मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलिबाग पाेलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे.  लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय पिंपळभाट येथे आहे. १७ सप्टेंबर २१ राेजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आरोपीने काहीही काम नसताना प्रवेश करीत संबंधित पोलीस फिर्यादी यांना ‘मला तुझी नोकरी घालवायची आहे. तुझी सगळी माहिती मी काढली आहे.  जमिनीच्या व्यवहारामध्ये एक काेटी रुपये घेतले आहेस. त्यातील मला ५० लाख दे’, नाही तर तुझी चौकशी करायला लावून कारवाई करायला सांगताे.’ त्यावर फिर्यादी यांनी, ‘मी काय म्हणून पैसे देऊ, मी काेणाकडूनही एवढी माेठी रक्कम घेतलेली नाही. मी एकही पैसा देणार नाही,’ असे सांगितले. याचा राग येऊन आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे असलेल्या पोलीस कर्मचारी सहकार्याने हस्तक्षेप करून प्रकरण साेडवले. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी देत आराेपी रिक्षातून निघून गेला. या आधीही आराेपी हा २० मे २०२१ राेजी फिर्यादीच्या घरी गेला हाेता. फिर्यादी तेथे हजर नसताना त्यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी आणि मुलाला धमकावत, ‘तुझ्या  वडिलांना ५० लाख रुपये द्यायला सांग नाही तर ऑफिसमध्ये जाऊन बदनामी करून नोकरी घालवून वाट लावेन,’ अशी धमकी दिली. या घटनेने विभागात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या घरामध्ये केली आरडाओरडफिर्यादीच्या घरी आला असता त्यांच्यासोबत आरडाओरड करीत ‘बिनशेती प्रकरणात तू घेतलेल्या एक कोटीपैकी ५० लाख रुपये मागितले. त्यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही ज्यांचे बिनशेतीचे काम केले आहे, त्यांच्याकडूनच पैसे घ्या,’ असे सांगितले आणि ‘माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नाही. यापुढे तुम्ही माझ्या घरी पैसे मागायला येऊ नका नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन,’ असे सांगितले हाेते. सातत्याने असे प्रकार हाेत असल्याने फिर्यादीने अलिबाग पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी