शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मृत्यू प्रमाणपत्राद्वारे ५० लाख लाटण्याचा प्रयत्न; पुण्यातील जोडप्यावर मुंबईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:56 IST

कंपनीच्या दावा विभागाने कागदपत्रांची पडताळणी केली आणि ती सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे बोगस मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करून ५० लाख रुपये विम्याची रक्कम लाटण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पुण्यातील एका जोडप्यावर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने एक खोटी कथा रचली होती. ज्यात विमाधारक पती म्हणजे आरोपीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस अहवालासह कागदपत्रांची पडताळणी करताना विमा कंपनीला कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. कोटक लाईफ इन्शुरन्सने शुक्रवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार आरोपी प्रकाश रामचंद्र माने (३६)  यांने यावर्षी जानेवारी महिन्यात कंपनीच्या वेबसाईटवरून २५ लाखांचा ई-टर्म प्लॅन घेतला होता. अपघाती मृत्यू झाल्यास त्याने २५ लाखांचे अतिरिक्त संरक्षणदेखील घेतले होते. ज्यात मानेचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी मयुरी ही जीवन विमा पॉलिसीचा एकमेव लाभार्थी (नॉमिनी) निर्देशित केले होते. मयुरीने १५ मार्च रोजी विमा कंपनीला माहिती दिली की, तिच्या पतीचा ६ मार्च २०२२ रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि त्यानुसार ५०  लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी दावा केला. तिच्या अर्जासोबत मयुरीने तिच्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्राची छायाप्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट, चौकशी पंचनामा, स्पॉट पंचनामा, गुन्हा यांसारखी संबंधित कागदपत्र सादर केली होती. तपशील फॉर्म, गावातील पोलीसपाटील यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि माने यांच्या वडिलांनी पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्यात दिलेले निवेदन याचाही  समावेश होता. 

...आणि फसवणूक उघड झाली“कंपनीच्या दावा विभागाने कागदपत्रांची पडताळणी केली आणि ती सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. आरोपी जोडप्याने आमच्या कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले,” असे तक्रारदाराने दिंडोशी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माने आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Accidentअपघात