शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला मुलं होत नाही म्हणून ५ वर्षीय बालकाचे अपहरण, वृद्ध महिला अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:10 IST

Kidnap Case : हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

ठाणे : मुलीला मुल-बाळ होत नसल्याने कचरा वेचकाच्या ५ वर्षीय बालकाचे अपहरण करणाऱ्या कळव्यातील ६० वर्षीय वयोवृद्ध उषा साळवे नावाच्या महिलेला कळवा पोलिसांनी अटक केली. तसेच अपहरणाच्या गुन्हयातील ५ वर्षाच्या मुलाची अवघ्या ४८ तासात सुखरूप सुटका केली. तर हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तसेच अपहारणकर्त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी       

कळवा पूर्व येथील मफतलाल झोपडपट्टी येथून १४ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कचरा वेचक प्रसाद कुटुंबातील ५ वर्षीय आदित्य नामक बालकाला राहत्या घराजवळून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार पालकांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार १५ मे रोजी गुन्हा दाखल करत कळवा पोलिसांनी काही एक ठोस माहिती नसताना तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजचा बारकाईने अभ्यास करून त्याआधारे अपहृत मुलगा व संशयित महिलेच्या वर्णनावरून कळवा - ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, चेंदणी कोळीवाडा, सिडको बस स्टॉप परिसर, काल्हेर, भिवंडी इत्यादी परिसरातील रिक्षा चालक, दुकानदार यांच्यांकडे बारकाईने केलेल्या चौकशीत तो मुलाला एका महिलेने नेल्याची माहिती पुढे आली.

इंद्राणी मुखर्जी ७ वर्षांनी येणार जेलबाहेर, सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

याचदरम्यान ती महिला कळव्यात राहत असल्याचे स्पष्ट झाल्यावर मोबाईल लोकेशन व सीडीआर वरून उषा धोंडीराम साळवे,(६०),या महिलेला घोडबंदर रोड, मानपाडा, येथून ताब्यात घेतली. चौकशीदरम्यान त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिले. तसेच पळवून नेले मुलास भिवंडीत नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार त्या बालकाची सुटका करत त्या बालकास पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अंबुरे यांनी दिली. ही कामगिरी कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, पोलीस निरीक्षक (प्रशासन), जितेंद्र कुंवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण बघडाणे, दिपक घुगे आदी पथकाने केली.

टॅग्स :ArrestअटकthaneठाणेKidnappingअपहरणPoliceपोलिस