शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब पडून ५ जणांचा झाला होता मृत्यू; दुर्घटनाग्रस्त मोहिनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 13:51 IST

Crime News : शहरात धोकादायक इमारतीची संख्या लक्षणीय असल्याने, पुनर्बांधणीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देसहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी तक्रार दाखल केली असून दुसऱ्या दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब पडून ५ जणांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डरावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी तक्रार दाखल केली असून दुसऱ्या दुर्घटनाग्रस्त साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा कधी? असा प्रश्न विचारला जात आहे. 

उल्हासनगरात सन १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेती व दगड्याच्या बारीक चुऱ्यातून बहुतांश इमारती बांधण्यात आल्या असून अश्या इमारतीचे स्लॅब पडून अनेक जणांचा बळी गेले आहे. गेल्या महिन्यात मोहिनी पॅलेस व साईशक्ती इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा बळी गेल्याने, शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले. महापालिकाने सन १९९४ ते ९८ दरम्यानच्या इमारतीचे सर्वेक्षण करून ५०५ इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिट करण्याच्या नोटिसा दिल्या. त्यापूर्वी १० वर्ष जुन्या इमारतींना नोटिसा देणे महापालिकेने सुरू केले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या मोहिनी व साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वस्तरातून होऊ लागल्यावर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार इमारतीचे बिल्डर मनोज लाहोरी यांच्या विरोधात अवैध व विना परवाना इमारत बांधून दुर्घटनेस व नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात केल्यावर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 दुर्घटनाग्रस्त मोहिनी पॅलेस इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल झाल्यावर, साईशक्ती इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी इमारतीचे स्लॅब पडून मृत्युमुखी पडलेल्या इमारत बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त व धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची मागणी होत आहे. शहरात धोकादायक इमारतीची संख्या लक्षणीय असल्याने, पुनर्बांधणीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसDeathमृत्यू