शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन सराईत गुन्हेगारासह ५ जणांना अटक; ९१ मोबाईल अन् औषधाच्या बाटल्या ५०२ हस्तगत

By कुमार बडदे | Updated: May 18, 2023 16:34 IST

मोबाईल मधील आयएमईआय नंबर ब्रेक करणारा फैसल शेख आणि जुबेर शेख या दोघानाही पोलिसांनी अटक करुन जुबैर याच्या जवळील १६ मोबाईलही ताब्यात घेतले.

कुमार बडदे

मुंब्रा -  मोबाईल चोरणारे, त्यातील आयएमइआय नंबर ब्रेक करणारे आणि चोरलेल्या मोबाईलची विक्री करणारा अशा एकूण पाच आरोपींना मुंब्रापोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यापैकी दोघे सराईत गुन्हेगार आहेत. अटक केलेल्या आरोपिंपैकी तिघांकडून विविध कंपन्यांचे ९१ मोबाईल आणि एका कडून नशेसाठी वापरण्यात येणा-या कपसिरपच्या ५०२ बाटल्या असा ऐकून ९ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल तसेच नंबर ब्रेक करण्यासाठी वापरण्यात येणारा लँपटाँप आणि साँफ्टवेअर पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणा-यांवर कारवाई करण्यासाठी गठित करण्यत आलेल्या पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकाने नुकताच फैयाज शेख याच्या घरातून चोरी केलेले ६२ मोबाईल आणि विक्री साठी जमा करुन ठेवलेल्या कपसिरपच्या ५०२ बाटल्या ताब्यात घेतल्या. चौकशी दरम्यान त्याने दिलेल्या माहिती वरुन मोबाईल चोरणारा त्याचा सहकारी शोएब शेख उर्फ राज याला अटक करुन त्याच्याकडून १३ मोबाईल ताब्यात घेतले.हे दोघे मोबाईल चोरुन विक्री करण्यासाठी ज्याच्याकडे देत होते त्या हन्जला अंसारी उर्फ कैफ याला तसेच मोबाईल मधील आयएमईआय नंबर ब्रेक करणारा फैसल शेख आणि जुबेर शेख या दोघानाही पोलिसांनी अटक करुन जुबैर याच्या जवळील १६ मोबाईलही ताब्यात घेतले.

सर्व आरोपि मुंब्रा शहरातील विविध ठिकाणी रहातात. न्यायालयाने त्याना १९ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.यातील फैयाज आणि शोएब हे सराईत गुन्हेगार आहेत.त्याच्या विरोधात मुंब्रा,मुंबईतील साकिनाका या पोलिस ठाण्यांमध्ये तसेच कुर्ला आणि ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती परीमंडळ १ चे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmumbraमुंब्राThiefचोर