शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न व्हिडिओ पाहिला अन् २ अल्पवयीन मुलींवर ५ जणांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:16 IST

Gangrape Case : या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.

पाटणा -  आज जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे महिलांच्या अब्रू लुटली जाण्याच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. या वाढत्या घटनांमुळे खरंच महिला इतक्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न बिहारच्या या धक्कादायक घटनेने उपस्थित होत आहे. काल बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील बारबिघा पोलीस ठाण्याच्या परिसरात ५ अल्पवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने पुन्हा आता मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मुली शेतात भाजीपाला तोडायला गेल्या असताना ही धक्कादायक घटना घडली. यावेळी अल्पवयीन मुलांनी मुलींची अब्रू लुटली. या मुलांनी मुलींना काही पैसे दिले आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले.याबाबत कोणालाही माहिती न देण्याची धमकी त्यांनी दिली. नातेवाईकांना हे समजताच त्यांनी त्या दोन मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र ३ मुले पळून गेले. या मुली सरकारी शाळेत इयत्ता ६ वी व ७ इयत्तेत शिकत आहेत. विधी संघर्ष बालकांपैकी ३ जण ६ वीच्या वर्गात शिकत आहेत. तसेच एक विधी संघर्ष बालक ७ वीत तर दुसरा ८ वीच्या वर्गात शिकत आहे. सापडलेली दोन मुले आणि पळून गेलेली तीन मुले ही एकाच गावचे रहिवासी आहेत. 

३७ लाख दे अन् निघून जा! बलात्काराच्या आरोपीकडून पोलिसाने घेतली लाच

यापैकी एक मुलगा हा मुलींच्या शेजारी राहतो असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी २ जणांना पकडून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या दरम्यान मुलांनी स्मार्ट फोनवर पॉर्न व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

विधी संघर्ष बालक अल्पवयीन असल्याने सध्या ते बाल कल्याण संकुल येथे रिमांड होममध्ये आहेत. यांच्यावर कलम १६४ अंतर्गत न्यायदंडाधिकार्‍यांसमोर त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ३७६ डी, ५०६ (२), १२० (बी) आणि ११४ यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस