शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉडरिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून ५ तास चौकशी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 22:07 IST

ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा सवाल विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला असा सवाल केला असता लक्षात येत नाही अशी रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तरं दिली. पुन्हा रॉबर्ट वाड्राची चौकशी होऊ शकते. 

ठळक मुद्देदुपारी 4 वाजल्यापासून रॉबर्ट वाड्रांची चौकशी असून रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल ५ तास चौकशी सुरु होती. लंडनमध्ये कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रांवर आरोप आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून  16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता. 

नवी दिल्ली - मनी लॉडरिंगप्रकरणी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी देखील पोहोचल्या होत्या. मात्र त्या गेटवरुन माघारी परतल्या. ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा प्रश्न विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला असा सवाल केला असता लक्षात येत नाही अशी रॉबर्ट वाड्रा यांनी उत्तरं दिली. उद्या पुन्हा वाड्राना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. 

दुपारी 4 वाजल्यापासून रॉबर्ट वाड्रांची रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल ५ तास चौकशी सुरु होती. लंडनमध्ये कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रांवर आहे. याच प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. त्यांनी लंडनमध्ये 12, ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ 19 लाख पाऊंड रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पटियाला न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनाबरोबर वाड्रा यांना न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना 6 फेब्रुवारीला चार वाजता कोर्टात हजर रहाण्यास सांगण्यात आलं होतं.सुनावणीदरम्यान ईडीने वाड्रा यांची परदेशातही संपत्ती असून त्यासाठी त्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या  वाड्रा यांच्याशी संबंधित कंपनीने 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 3.5 एकर जमीन 7.50 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन 58 कोटी रुपयांना विकली आणि 509 कोटी रुपये नफा कमाविला, असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून  16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसा