शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 08:51 IST

निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या.

एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारमधील ड्रग इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याकडे तब्बल पाच पोती भरून नोटा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन मागविण्यात आली आहे.निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या. या नोटा तब्बल १.५ कोटी रुपयांच्या असू शकतील, असा अंदाज आहे. छाप्यात अडीच किलो चांदी व अर्धा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आढळले. या छाप्यात मालमत्तेची अनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. जलालपूर शहरात एक फ्लॅट, जहानाबादमध्ये घर व जमिनीची कागदपत्रे यात आहेत. पाटण्यात त्यांचा एक फ्लॅट आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये त्यांचा आणखी एक फ्लॅट आहे. याबाबत तपास सुरू असून, आणखी मालमत्ता बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नोटा मोजण्यासाठी मशीन मागविली आहेत.दोन कोटींपेक्षा मोठे घबाडहा अधिकारी पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करीत होता, असा आरोप आहे. राज्य सरकारकडे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर एक पथक तयार करून त्याच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त माया आढळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस