शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली ४ लाखांना, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 09:16 IST

कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर परिसरात राहणारा आदित्य (वय २१) विद्यार्थी आहे. त्याचे वडील परदेशात नोकरी करतात.

मुंबई :  क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून ३ लाख ९९ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर परिसरात राहणारा आदित्य (वय २१) विद्यार्थी आहे. त्याचे वडील परदेशात नोकरी करतात. आदित्यला क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असल्याने त्याने १९ जुलैला गुगलवर याबाबत माहिती शोधली. त्याला दोन कंपन्यांची माहिती आणि रेटिंग चांगले वाटले. त्याने या कंपन्यांच्या संकेतस्थळावर मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी यांची नोंद करून सबस्क्रिप्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच आदित्यच्या मोबाइलवर एका अनोळखी महिलेने काॅल केला. तिने ऑल इंडिया क्रिप्टो सर्व्हिस लि. या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत क्रिप्टोतील गुंतवणुकीबद्दल आदित्यला विचारणा केली. आदित्यने होकार देताच तिने कंपनीचे नियम आणि अटी सांगून सुरुवातीला कमीत कमी १२ हजार ६०० रुपये गुंतणूक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर ५ ते १० टक्के मोबदला मिळणार असून सहा महिन्यांसाठी नोंदणीचे ८०० रुपये भरण्यास सांगितले. 

 आदित्यला आणखी एका महिलेचा काॅल आला. तिनेही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची असल्यास १४, ५०० रुपये गुंतवणूक व नोंदणी फी म्हणून १,०७० रुपये भरण्यास सांगितले. आदित्यने दोन्ही कंपन्यांत पैसे भरताच दोन्हीकडून सुरक्षित ठेव, गुंतवणूक चार्जेस, खात्याची खातरजमा, रिफन्ड चार्ज, होल्ड झालेली रक्कम रिलीज करणे, दंड, नावात बदल करण्याचा चार्ज, करारपत्र चार्ज अशी वेगवेगळी कारणे देत आदित्यकडून ३ लाख ९९ हजार रुपये उकळले. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटताच आदित्यने नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी