शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या शेलार हल्ल्याप्रकरणी ४ जणांना अटक, सूत्रधार मोकाट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 20:48 IST

Attack Case : उल्हासनगर मनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार हे मित्रा सोबत ८ ऑक्टोबर राजी सकाळी नेहमीप्रमाणे अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलाच्या रस्त्याने मॉर्निग वॉक करीत होते.

ठळक मुद्देशहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे साफळा रचून कल्याण, भिवंडी परिसरात राहणाऱ्या साजिद मोहम्मद वकील शेख, अक्षय विनोद गिरी, दीपक तिवारी व रोहित कांबळे यांना कल्याण दुर्गाडी पुलाजवळ अटक केली.

उल्हासनगर : मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर गेल्या महिन्यात मॉर्निंग वॉक वेळी चौघांनी तलवारीने हल्ला केला. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ४ जणांना अटक केली असून न्यायालयाने ११ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली. मात्र मुख्य सुत्रदार खुला असल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली.

 उल्हासनगरमनसे विध्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मनोज शेलार हे मित्रा सोबत ८ ऑक्टोबर राजी सकाळी नेहमीप्रमाणे अंबरनाथ गोविंद तीर्थ पुलाच्या रस्त्याने मॉर्निग वॉक करीत होते. त्यावेळी दोन मोटार सायकळीवरून आलेल्या चौघांनी मनोज शेलार यांच्यावर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तलवारीने हल्ला केला. मात्र शेलार यांच्या सतर्कतेमुळे तलवारीचा वार हातावर लागून आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान अंबरनाथ मनसे उपशहाराध्यक्ष पाटील यांचा खून झाल्याने, शेलार यांच्या तपासात गती आली. शहर गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास करीत असताना व शेलार यांच्या गुन्हेगारांच्या विश्लेषणावरून ६ नोव्हेंबर रोजी कल्याण दुर्गाडी पूल परिसरातून चौघांना मोटारसायकली वरून जाताना अटक केली आहे.

 शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहितीच्या आधारे साफळा रचून कल्याण, भिवंडी परिसरात राहणाऱ्या साजिद मोहम्मद वकील शेख, अक्षय विनोद गिरी, दीपक तिवारी व रोहित कांबळे यांना कल्याण दुर्गाडी पुलाजवळ अटक केली. त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेली तलवार, मोटारसायकल, दोन मोबाईल जप्त केले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला. त्या सुत्रधाराचे नाव उघड न झाल्याने विविध चर्चेला उत आला. न्यायालयाने त्यांना ११ नोव्हेंबर पर्यंत चौघाना पोलीस कस्टडी देण्यात आली असून त्यांच्यावर  कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख महेश तरडे यांनी दिली आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरMurderखूनMNSमनसे