शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सलीम मुल्लाच्या कनेक्शनमधून ३६ लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 19:39 IST

आतापर्यंत ३९ आरोपींना अटक; पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असलेचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत ३९ आरोपींना ‘मोक्का’कारवाईखाली अटक केली आहे

कोल्हापूर - मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायाच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशोबी ३६ लाख रुपये व हिशोबाच्या वह्या पोलीसांनी हस्तगत केले आहेत. आतापर्यंत ३९ आरोपींना ‘मोक्का’कारवाईखाली अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करणाऱ्या ‘मुल्ला गँग’चा मुख्य म्होरक्या सलीम मुल्लासह त्याची पत्नी शमा, भाऊ फिरोज, राजू, जावेद यांच्यासह ४० जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल करून, संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली ‘मोक्का’ कारवाई केली आहे. मुल्ला याच्या घरझडतीमध्ये जुगार, गांजा तस्करी, सावकारकीतून बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे. मुल्लाने विशिष्ट टोपन नावाने कुरीअर सर्व्हीसच्या मार्फत अंगडीया सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरुन आर्थिक व्यवहार पार पाडत असल्याचे निष्पन्न झाले. मटका, जुगारामधून मिळालेले पैसे मुंबईतील सावला गॅग’चा जयेश शहा व जितेंद्र गोसालीया यांना कुरीअर सर्व्हीसच्या माध्यमातून टोपन नावाने संकलीत केलेले पैसे वर्ग करतात. हे पैसे मालाड, मुंबई येथील डायमंड मार्केट मध्ये अंगडीया कंपनीकडे पाठविले जातात. ते संकलीत करण्यासाठी रवी प्रभुदास ठक्कर याचेकडे दिले जातात. तो जयेश शहा, जितेंद्र शहा व जयंतीलाल ठक्कर यांना देवून ती रक्कम रमेश कांतीलाल नावाच्या व्यक्तिकडे ठेवण्यासाठी देत होते. त्यासाठी ते मोबाईलवरुन एकमेकाच्या संपर्कात राहत असत. मुल्ला आणि सावला गॅंगच्या व्यवहाराची माहिती असणाऱ्या हिशोबाच्या वह्या व ३६ लाख रुपये हस्तगत केले. गेले सात दिवस या कारवाईमुळे मुंबई मटक्याचा आकडा निघाला नाही. तो बंद राहिला. ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असलेचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसkolhapurकोल्हापूरRobberyदरोडा