शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या नावावर ३४ लाखांनी फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 23:51 IST

रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देफसवणूक झालेल्यांमध्ये १२ लोकांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने स्वत:चा मुलगा व मुलीच्या माध्यमातून १२ जणांना ३४.४५ लाख रुपयांनी फसविले आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीमध्ये अर्चना राकेश मेहता, तिचा मुलगा निर्भय मेहता, मुलगी हिना मेहता व सहकारी फारुख शेख यांचा समावेश आहे.आरोपी मूळचे मुंबईतील रहिवासी आहेत. अर्चना स्वत:ला रेल्वेतून भंगार खरेदी करणारी व्यावसायिक सांगत होती. ती २०१४ मध्ये मनीषनगर येथे किरायाने राहत होती. दरम्यान, ती कळमना येथील फुलेश्वर दुबेले यांच्या संपर्कात आली. तिने दुबेले यांना रेल्वेत ओळखी असल्याचे सांगितले. रेल्वेत चतुर्थ श्रेणीच्या पदावर नोकरी लावून देण्याचे सांगितले. दुबेले यांनी त्यांच्या परिचित लोकांना अर्चनाशी ओळख करून दिली. तिने सर्वांना नोकरी लावून देण्याचा विश्वास दिला. त्यासाठी दुबेलेच्या माध्यमातून तिने १२ लोकांकडून ३४.४५ लाख रुपये घेतले. त्यांचे मुंबईच्या सेंट्रल रेल्वे हॉस्पिटलचे बोगस प्रमाणपत्र बनविले. बनावट नियुक्तीपत्रही त्यांना दिले. नोकरी न लागल्यामुळे दुबेले व त्यांच्या परिचितांची चिंता वाढली. त्यांनी चौकशी केल्यावर नियुक्तीपत्र बोगस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते अर्चनाकडून पैसे परत मागू लागले. फसवणुकीचे घबाड उघडकीस आल्यामुळे अर्चना डिसेंबर २०१९ मध्ये कुटुंबासह फरार झाली. त्यानंतर पीडितांनी तिला संपर्क केला, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.शिक्षिकेने केली फसवणूकशाळेत चपराशी पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८.५० लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एका शिक्षिकेविरोधात गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचे नाव चंद्रभागा मनोहर सोनवणे असून ती भोलेनगर, पिपळा रोड येथील रहिवासी आहे. ही शिक्षिका नंदनवन स्थित जवाहर शाळेत कार्यरत आहे. पीडित आशिष मौदेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार शिक्षिकेने शाळेत चपराशी पदावर नोकरीवर लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ८.५० लाख रुपये घेतले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjobनोकरीfraudधोकेबाजी