शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सेल्स टॅक्स अधिकारी बनून अंगडियाच्या ३२ लाखांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:02 IST

मंगलदास मार्केटचा सुरक्षारक्षक सुपरवायझर निघाला लुटारू

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : झवेरी बाजार बुलियन मार्केटमधील एका व्यावसायिकाला अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणे ईडीचे अधिकारी असल्याचे भासवत सुमारे चार कोटींच्या ऐवजाची लूट करण्यात आल्याची घटना ताजी असताना सेल्स टॅक्स अधिकारी बनून दोघांनी ३२ लाखांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी घडली. या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संजयसिंग करचोली (३३), रजिया शेख (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

 काळबादेवी येथील रहिवासी असलेले तक्रारदार जठाराम प्रजापती (२८) हे अंगडिया  बाबूलाल प्रजापती (३८) यांच्याकडे पैसे तसेच कपड्याचे पार्सल घेणे-देण्याचे काम करतात.  २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विष्णू कांती अंगडियाकडून त्यांच्या  मालकाच्या व्यवहाराचे ३२ लाख रुपये घेऊन येत असताना करचोली आणि शेख यांनी ते सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडील रोकड आणि आणि मोबाइल हिसकावून पळ काढला. प्रजापती यांनी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार, पोलिस उपायुक्त अभिनव देशमुख, सहायक पोलिस आयुक्त जोत्स्ना रासम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  ज्योती देसाई यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी राहुल भंडारे, इलग, बनकर, रूपेश पाटील, लाड, भाले आणि अंमलदार यांनी तपास सुरू केला. 

यापूर्वी ‘स्पेशल २६’ रिटर्न झवेरी बाजार बुलियन मार्केटमधील एका व्यावसायिकाला अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाप्रमाणेच ईडीचे अधिकारी बनून लुटणाऱ्या टोळीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींनी धमकावून ३ किलो सोने आणि २५ लाख रुपये लुटल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्या बॅगांमध्ये सव्वा दोन कोटी रुपये होते, अशी माहिती व्यावसायिक विराटभाई यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या आरोपींजवळून लुटीतील १ कोटी ९० लाख रुपये हस्तगत केले आहेत.

 सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींनी वापरलेल्या दुचाकीचा माग काढून करचोलीला मंगलदास मार्केट परिसरातून ताब्यात घेतले. तो मंगलदास मार्केटमध्ये सुरक्षारक्षक सुपरवायझर म्हणून काम करतो. शेखच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली देताच शेखलाही अटक केली. दोघांना  १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी