शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर विमानाच्या शौचालयातून ३१ लाखांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 16:44 IST

कुवेतहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९७६) विमानात तस्करीचा माल असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी ह्या विमानाची तपासणी करण्यास सुरवात केली.

ठळक मुद्दे प्लास्टिक पिशवीत घालून ठेवलेले १ किलो  ८६ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आलेविमान कुवेतहून दाबोळीवर आल्यानंतर येथून चेन्नईला जाणार होते एअर इंडिया विमानाच्या शौचालयातून कस्टम विभागाने लपवून ठेवलेले ३१ लाख ३ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने जप्त

वास्को - आज पहाटे दाबोळी विमानतळावर कुवेतहून आलेल्या एअर इंडिया विमानाच्या शौचालयातून कस्टम विभागाने लपवून ठेवलेले ३१ लाख ३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. विमान कुवेतहून दाबोळीवर आल्यानंतर येथून चेन्नईला जाणार होते, मात्र यात सोने लपवण्यात आल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी विमानात तपासणी केली असता प्लास्टिक पिशवीत घालून ठेवलेले १ किलो  ८६ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले.

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे या कारवाई करण्यात आली. कुवेतहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडिया (एआय ९७६) विमानात तस्करीचा माल असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी ह्या विमानाची तपासणी करण्यास सुरवात केली. विमानाच्या शौचालयात प्लास्टिक पिशवीमध्ये सोन्याचे दागिने असल्याचे दिसून येताच ते ताब्यात घेऊन घेण्यात आले. यानंतर हे सोन्याचे दागिने कोणाचे आहेत काय अशी विचारपूस अधिकाऱ्यांनी केली असता त्या दागिन्यांसाठी कोणी दावा केला नसल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली. दाबोळीवर आलेले हे विमान येथून नंतर चेन्नईला जाणार होते व शौचालयात लपवण्यात आलेले हे तस्करीचे सोन्याचे दागिने दाबोळी विमानतळावरून चढणारा एक प्रवासी चेन्नईला उतरवून नेणार होता असा संशय कस्टम अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी या कारवाई केली असून तस्करीचे सोने कुठल्या प्रवाशाने ह्या विमानात लपविले होते व ते कुठे नेण्यात येत होते याबाबत कस्टम विभाग सध्या तपास करीत आहेत.दाबोळी विमानतळावर ह्या आर्थिक वर्षाच्या (एप्रिल २०१८) सुरवातीपासून अजूनपर्यंत ७ किलो १४५ ग्राम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी देऊन याची एकूण रक्कम २ कोटी १४ लाख रुपये होत असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त अजूनपर्यंत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावरून ह्या अर्थिक वर्षापासून अजूनपर्यंत ३६ लाख ३८ हजार रुपयांची विविध विदेशी चलने जप्त केली असून ३८ लाख ९ हजार रुपयांची इतर सामग्री दाबोळी विमानतळावरून जप्त केल्याचे माहितीत सांगितले.   

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंAirportविमानतळ