शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कपड्यात लपवून नशेसाठी ३० लाखांच्या कफ सिरपची तस्करी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:51 IST

या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली. 

ठळक मुद्दे मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. अटक केलेल्या आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  म्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5760 कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. 

मुंबई -  मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नशेसाठी आणलेला कफ सिरपचा ३० लाखांचा साठा हस्तगत केला आहे. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान या ठिकाणी पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्या भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली असून हे सर्व कपड्यात लपवून कफ सिरपच्या बाटल्यांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख, अझहर जमाल सय्यद या चौघांना अटक करण्यात आली. गुजरातहून मोठ्या प्रमाणावर 'कोडेन फॉस्फेट' या सिरपचा साठा मुंबईत येणार असून तो नशेसाठी वितरित केला जाणार असल्याची मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती आणि एक टेम्पो भरून कफ सीरपच्या बाटल्या मुंबईत आणण्यात येताच पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान येथून एक टेम्पो ताब्यात घेतला. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते तर अन्य दोघे या कफ सिरपची नशेसाठी खरेदी करण्यासाठी आले होते. टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5760 कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. अटक केलेल्या आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

 

टॅग्स :ArrestअटकAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकPoliceपोलिस