शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

३० लाखाची खंडणी, महिला टीचरसोबत अफेअर?; १० वी तील युवकाच्या हत्येचं गुपित उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:02 IST

प्रभातच्या या प्लॅनिंगमध्ये रचिता आणि त्याचा मित्र आर्यनही सहभागी होता. कुशाग्रची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचलं

कानपूर – उत्तर प्रदेशातील कानपूर इथं एका व्यापाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. मृत मुलगा हा १० वीच्या वर्गात शिकायला होता, त्याचे नाव कुशाग्र होते. सोमवारी कुशाग्र त्याच्या स्कूटीवरून ट्यूशनला जाण्यासाठी घरातून निघाला. परंतु रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नाही त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली. त्यावेळी अचानक काही अज्ञातांनी व्यापाऱ्याच्या घरी ३० लाख रुपयांची खंडणी देण्याची चिठ्ठी फेकली आणि फरार झाले.

घाबरलेल्या कुटुंबाने थेट पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. अपहरणाची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ पाऊले उचलली. स्वत: घटनास्थळी पाहणीसाठी सहपोलीस आयुक्त पोहचले. मात्र सकाळी कुशाग्रचा मृतदेह सापडला. त्यात धक्कादायक खुलासा झाला. पोलीस सूत्रांनुसार, व्यापाऱ्याचा १६ वर्षीय मुलगा कुशाग्रचा मृतदेह त्याची ट्यूशन टिचर रचिताच्या घरी स्टोअर रुममध्ये आढळला. कुशाग्रची हत्या करणारा अन्य कुणी नसून रचिताचा बॉयफ्रेंड प्रभात होता. प्रभातला कुशाग्रचं रचितासोबत अफेअर सुरू असल्याची शंका होती. त्यातूनच त्याने कुशाग्रची हत्या करण्याचे प्लॅनिंग आखले.

प्रभातच्या या प्लॅनिंगमध्ये रचिता आणि त्याचा मित्र आर्यनही सहभागी होता. कुशाग्रची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रभातने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी षडयंत्र रचलं. खंडणीसाठी कुशाग्रची हत्या झाल्याचा बनाव रचला. अपहरण, खंडणी त्यातून पोलिसांचा तपास भरकटेल असं प्रभातने रणनीती आखली. रचिताच्या घरी कुशाग्रची हत्या करून प्रभातने आधी त्याची स्कूटर घेतली, त्यानंतर आर्यनला सोबत घेत त्याची नंबरप्लॅट बदलली. त्यानंतर ३० लाखांची खंडणी मागणारी चिठ्ठी कुशाग्रच्या घरी फेकली आणि फरार झाले. चिठ्ठीत काही धार्मिक घोषणाही दिल्या होत्या जेणेकरून पोलिसांचा गोंधळ होईल.

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, काही लोकांची चौकशी केली. त्यात कुशाग्रची टीचर रचिताचे नाव आले. रचिता आधी कुशाग्रच्या घरी येऊन त्याला शिकवत होती. मात्र घरच्यांनी तिला काढून टाकले होते. रचिताची चौकशी केल्यावर प्रभातचे नाव समोर आले. त्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून खाकीचा धाक दाखवला. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु सीसीटीव्हीत घटनास्थळी आसपास प्रभातची हजेरी आणि खंडणीच्या चिठ्ठीतील हँडरायटिंग यावर संशय बळावला. पोलिसांनी जाब विचारताच दोघांनी सत्य उघड केले.

कुशाग्रचा मृत्यू संध्याकाळी साडे पाच वाजता झाला होता. खंडणीची मागणी केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी होती. सीसीटीव्ही पाहिले असता कुशाग्र स्वत:च्या मर्जीने रचिताच्या घरी गेला होता. त्यानंतर रचिताचा बॉयफ्रेंड प्रभात घरात जातो. त्याचे घर रचिताच्या घराजवळच आहे. दोघे काही वेळाने बाहेर येतात परंतु कुशाग्र दिसत नाही. त्याच काळात घरी हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी