शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुले चोरल्याच्या अफवेतून २ तरुणींसह तिघांना मारहाण. तळोजातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 07:21 IST

मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी एका रिक्षाचालकाला व दोन तरुणींना बेदम मारहाण

पनवेल :

मुले चोरण्यासाठी आल्याचे समजून तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी एका रिक्षाचालकाला व दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याची घटना तळोजा येथे तीन दिवसांपूर्वी  घडली. या मारहाणीत रिक्षाचालकाच्या रिक्षाची देखील तोडफोड केली आहे. या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव महम्मद गुलमोहम्मद शकील अन्सारी (२४) असे असून तो शिळफाटा येथील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहतो. महम्मद अन्सारी हा भाड्याने रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मोहम्मद अन्सारी हा प्रवासी घेऊन कळंबोली येथे गेला होता. त्यानंतर तो  पुन्हा शिळफाटा येथे प्रवासी घेऊन जाण्यास निघाला होता. तळोजा गाव येथे दोन महिला प्रवाशांना सोडल्यानंतर महम्मद अन्सारी याला शिळफाटा येथे राहणाऱ्या त्याच्या ओळखीतील दोन तरुणी निदर्शनास आल्या. त्यामुळे महम्मद अन्सारी हा त्या तरुणींकडे विचारपूस करत असतानाच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी सदर तरुणी या मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रिक्षाचालक महम्मद अन्सारी याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी तो देखील मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यालाही मारहाण केली.

... आणि सुरू झाली मारहाण हा प्रकार पाहून त्या भागातील इतर नागरिकांनी महम्मद अन्सारी हा मुले चोरणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचे सांगत त्याला मारहाण करत त्याच्या रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन रिक्षा चालक महम्मद अन्सारी याची मारहाण करणाऱ्या लोकांच्या तावडीतून सोडवणूक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी