शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! 3 महिन्यांच्या लेकीला आईनं तिसऱ्या मजल्यावरुन फेकलं; कारण काय तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 18:17 IST

एका निर्दयी आईनं आपल्याच पोटच्या पोरीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आई आपल्या मुलांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपते. पण गुजरातमधून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण झालंय. एका आईनं आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकल्याची घटना घडलीये. या घटनेत त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 23 वर्षीय आईला अटक केली आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला घडली आहे. 

पोलिसांनी सांगितल्यानुसार, गुजरातमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. मुलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकणारी महिला ही आणंदमधील पेटलाड येथील रहिवासी आहे. फरझानबानू मलेक असे या महिलेचे नाव आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिची तीन महिन्यांची मुलगी अमरीनबानू जन्मापासूनच आजारी होती. तिला खूप त्रास व्हायचा, तिचा त्रास कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले. आईच्या या निर्दयतेची कहाणी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तीन महिन्यांच्या मुलीला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या हत्येनंतर आईने मूल रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा दावा केला. पण, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती आपल्या मुलीसोबत गॅलरीत फिरताना आणि नंतर रिकाम्या हातानं परत येताना दिसली. यानंतर चौकशीत आईने गुन्ह्याची कबुली दिली. 

 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस