पिंपरी : हातउसने पैशांची मागणी करून मारहाण केल्याच्या घटनेत महिला जखमी झाली. मंगळवार, दि. ४ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पतीपत्नीसह तीन जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भानुदास बोरकर (वय ४२), सुवर्णा संतोष बोरकर (वय ३७, दोघे रा. जय गणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, भोसरी) या पती पत्नीसह अन्य एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लक्ष्मण जिजाबा वाडेकर (वय ४५, रा. वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी संतोष बोरकर आणि त्यांच्या एका मित्राने पॉलिसीचे पैसे भरण्याच्या कारणावरून तसेच फिर्यादी लक्ष्मण वाडेकर यांनी त्यांच्या मुलाबरोबर अश्लील वर्तन केल्याच्या गैरसमजातून मारहाण केली. तसेच आरोपी सुवर्णा बोरकर यांनी बांबूच्या दांडक्याने पाठीवर, हातावर व कमरेवर मारहाण केली. फिर्यादी वाडेकर यांच्या गाडीची चावी काढून घेतली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसविले. तसेच त्यांना ३ लाख रुपये उसण्या पैशांची मागणी केली. आरोपी संतोष बोरकर आणि त्यांच्या मित्राने भोसरीतील जय गणेश साम्राज्य येथून वाडेकर यांना गाडीत बसवून त्यांच्या खेड येथील घरी घेऊन गेले. तेथेही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत ३ लाख रुपये हातउसने मागून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 17:38 IST