शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत 3 घरफोडीच्या घटना उघड, 5 जणांना मुद्देमालासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 00:00 IST

या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.

भिवंडी : भिवंडीत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच नारपोली पोलिसांनी तीन घरफोडीच्या घटनांची उकल करून चोरीला गेलेल्या ४० लाखांच्या मुद्देमालासह ५० लाखांचे दोन आयशर टेम्पो असा एकूण ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या घरफोडीच्या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.              नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील गोडाऊनचे लोखंडी शटर उचकटून गोदाम मध्ये ठेवलेल्या सुमारे १६ लाख ९३ हजार रुपये किमतीचा १४ टन ५०० किलो वजनाचा प्लास्टिक दाण्याचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली होती. त्याचबरोबर १४ फेब्रुवारी रोजी वळगाव येथील कृष्णाबाई कंपाऊंड मध्ये असलेल्या पियू केम इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊन शटर उघडून सुमारे १९ लाख ७६ हजार ५५५ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या केमिकल पावडरचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. तर ७ फेब्रुवारी दरम्यान राहनाळ गावातील श्री साई सद्गुरू कंपाऊंडमधील सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनच्या भिंतीला होल पाडून आत प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे ६ लाख ५० हजार १८० रुपये किमतीचा प्लास्टिक दाण्याचा माल चोरून नेला होता. या तिन्ही चोरीच्या घटनांची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.            नारपोली पोलिसांनी तांत्रिक माहिती तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास केला असता या तीन घरफोडी प्रकरणी मोहंमद सिकंदर ऊर्फ शाहरुख मुस्‍तकीम चौधरी वय २१ परवेज मकसूद आलम खान वय ३९ जाकीर जाहिद खान वय ३१ लोकेश हेमराज बोरा वय ४० सलीम अहमद जब्बार अहमद अन्सारी वय ४७ अशा पाच जणांना अटक केली असून या तिन्ही गुन्ह्यातील सुमारे चाळीस लाख चार हजार एकशे दहा रुपयांचा प्लास्टिक दाणा व ग्राफाईट पावडर असा मुद्देमाल व पन्नास लाख किमतीचे दोन आयशर टेम्पो असा एकूण ९० लाख ४ हजार ११० रुपये किंमतीचा मुद्देमाल नारपोली पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी