शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

उत्तन येथे १५ वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ३ आरोपीना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 11:27 PM

Crime News : एका १५ वर्षीच्या अल्पवयीन आदिवासी मुलीला बळजबरी उचलून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तिघा हि आरोपीना अटक केली आहे .

 मीरारोड - एका १५ वर्षीच्या अल्पवयीन आदिवासी मुलीला बळजबरी उचलून निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तिघाही आरोपीना अटक केली आहे . सदर आरोपी पुलंचे उत्तर प्रदेशचे आहेत . ह्या घटनेने उत्तन परिसर हादरला असून स्थानिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे . अंबेस गौतम (२०), इंद्रजित गौतम (२४) आणि संजय भारती (२६) अशी आरोपींची नावे असून, हे  तिघेही उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर जिल्ह्यातील मुसताबादचे राहणारे आहेत. उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना हि मंगळवारी रात्री साडे आकरा ते साडे बारा दरम्यान घडली . पीडित मुलगी हि तिची अल्पवयीन मैत्रीण व त्या मैत्रिणीचे २ अल्पवयीन मित्र असे गप्पा मारत बसले होते . त्यावेळी अनुक्रमे २० , २४ व २६ वर्षीय तिघे आरोपी तेथे गेले व दोन्ही अल्पवयीन मुलींना दमदाटी करून बळजबरी नेऊ लागले . पीडितेची मैत्रीण व तिचे २ मित्र कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटले व घेरी जाऊन त्यांनी घडला प्रकार सांगितला .परंतु तिघांनी पीडितेला मात्र पकडून धावगी डोंगरा खालील मासळी सुकवण्यासाठीच्या असलेल्या निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला व पसार झाले . दरम्यान गावात पीडितेला नेल्याचे कळल्यावर सर्वानी शोधाशोध सुरु केली तसेच पोलिसांना कळवले .पोलीस निरीक्षक प्रशांत लागीं व पोलीस पथकाने तातडीने तपास सुरु करत सदर तिघाही आरोपीना अटक केली . तर पीडितेस उपचारासाठी व तपासणी साठी रुग्णालयात पाठवले . ठाणे न्यायालयात बुधवारी तिघाही आरोपीना हजर केले असता न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .पीडित आदिवासी मुलीचे आई वडील हे लहान पणीच वारले असून येथील एका मच्छिमार कुटुंबीयांनी तिचा कुटुंबातील सदस्य प्रमाणेच मोठे केले . तर नराधम आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते मागासवर्गीय समाजातील आहेत . आरोपी देखील मच्छिमारां कडे त्यांच्या बोटीवर काम करणारे आहेत . अश्या प्रकारची घटना उत्तन परिसरात पहिल्यांदा घडल्याने खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे