शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

रोडरोमिओंना पोलिसांचा हिसका, २४ तरुणांना ताब्यात घेऊन केली धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:51 IST

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या वीसहून अधिक रोडरोमिओंची लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८) धरपकड केली.

उरुळी कांचन - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाबाहेर विनाकारण घुटमळणाऱ्या वीसहून अधिक रोडरोमिओंची लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ८) धरपकड केली. महाविद्यालयात प्रवेश नसतानाही, महाविद्यालयाच्या परिसरात तसेच महाविद्यालयाच्या बाहेर फिरणाºया २४ तरुणांना ताब्यात घेऊन चांगलीच धुलाई केली.सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान व त्यांच्या सहकाºयांनी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश करून परिसरात फिरणाºया युवकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे असणाºया वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली. यात २४ टारगट मुले परवानगी नसतानाही विनाकारण महाविद्यालयाच्या आवारात फिरताना आढळले. पोलिसांनी संबंधित युवकांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच संबंधितांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या पाल्याचे प्रताप त्यांना सांगितले.याबाबत अधिक माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान म्हणाल्या, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसतानादेखील विनाकारण शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोर आणि टारगट तरुणांची गर्दी पाहायला मिळते. विनाकारण वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे यासारखे उद्योग या टवाळखोरांकडून केले जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढते आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली.ही कारवाई सातत्याने चालू राहणार आहे. टारगट मुलांनी व त्यांच्या पालकांनी दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल. दरम्यान यावेळी सुवर्णा हुलवान यांनी महाविद्यालयीन युवतींशीही संवादही साधला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी