शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:26 IST

सोनम रघुवंशीनंतर आता आणखी एका मुलीचा कारनामा पुढे आलाय जिने पैशाच्या लालसेपोटी अवघ्या ६ वर्षात ८ बॉयफ्रेंड बनवले

केवळ १८ वर्ष त्या मुलीचं वय, जेव्हा ती पहिल्यांदा प्रियकरासोबत तिच्या एका मित्राच्या लग्नात सहभागी झाली होती. सगळीकडे रोषणाई, महागडे डिझाईन कपडे, डोळ्यांचे पापणे फेडणारी सजावट..हे पाहून तिच्याही मनात अशीच आलिशान लाईफ जगण्याचं स्वप्न रंगवले. आपल्या स्वत:चे घर असावे, महागडे कपडे घालावे, लग्झरी गाड्यांमधून फिरायचे परंतु या सगळ्यासाठी आवश्यकता असते ती पैशांची..या पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने अशी शक्कल लढवली की तिला आता जेलच्या कोठडीत राहावे लागतेय. 

सोनम रघुवंशीनंतर आता आणखी एका मुलीचा कारनामा पुढे आलाय जिने पैशाच्या लालसेपोटी अवघ्या ६ वर्षात ८ बॉयफ्रेंड बनवले. ती सुंदर दिसावी आणि मुले दिसताच क्षणी तिच्या प्रेमात पडावे यासाठी मुलीने स्वत:ची प्लॅस्टिक सर्जरही केली. त्यानंतर सोशल मीडियाच्या मदतीने तिने अशा मुलांचा शोध घेतला जे सिंगल आहेत, श्रीमंत आहे. हळूहळू ती त्या मुलांना जाळ्यात अडकवायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायची. मात्र तिच्या ९ व्या बॉयफ्रेंडने हा सगळा प्रकार उघड केला. 

हे प्रकरण चीनच्या हुनानमधील आहे. एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला.  Yin Xue असे या मुलीचे नाव आहे. जेव्हा तिने तिच्या मित्राचे शाही लग्न पाहिले तेव्हा तिनेही स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. आपलेही लग्झरी आयुष्य असावे असं तिला वाटत होते पण त्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. हे आयुष्य जगण्यासाठी तिने छोटी-मोठी नोकरीही केली परंतु यातून तिचे स्वप्न पूर्ण होणार नव्हते. तिला जी लाईफ जगायची होती त्यासाठी १० मिलियन युआन म्हणजे १२ कोटींची गरज होती. त्यासाठी तिने ५ वर्षाचे टार्गेट घेतले. ही रक्कम जमा करण्यासाठी तिने बचत केलेल्या पैशातून स्वत:ची प्लॅस्टिक सर्जरी केली जेणेकरून सुंदर दिसावी. 

प्रेमातून फसवणुकीचा खेळ

मार्च २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावर वेगवेगळे अकाऊंट बनवले. श्रीमंत मुलांशी मैत्री करणे सुरू केले. आधी बोलणे, त्यातून भेटणे मग प्रेमाचा सिलसिला सुरू होत होता. इतकेच नाही तर ती ज्याला प्रियकर बनवायची त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहायची. ही मुले जेव्हा एखाद्या कामानिमित्त घरातून बाहेर जायचे तेव्हा त्यांच्या मौल्यवान वस्तू सेकंड हेंड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकून द्यायची. एकदा सामान विकल्यानंतर ती त्या प्रियकराला सोडून द्यायची आणि नवा मुलगा शोधायची. तिने ८ बॉयफ्रेंडच्या घरातून तब्बल २५ लाख रूपये जमा केले. बदनामीच्या भीती अनेक मुलांनी तिच्याविषयी तक्रार केली नाही. 

९ व्या बॉयफ्रेंडने पर्दाफाश केला

८ व्या बॉयफ्रेंडला सोडून तिने ९ व्याचा शोध घेतला. तिने त्याला जाळ्यात ओढले आणि त्याच्या घरी लिव्ह इनमध्ये राहू लागली. या प्रियकराच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, ज्याचा एक्सेस त्याच्या मोबाईलवर होता. फ्रेब्रुवारी २०२२ मध्ये व्हेलंटाईन दिवशी जेव्हा तो घराबाहेर गेला तेव्हा ती मुलगी त्याच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करत होती. त्यानंतर तो घरी पोहचला आणि तिला रंगेहाथ पकडले. त्याने पोलिसांना फोन केला, त्यानंतर तिच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीत तिने केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी