शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लॉजमध्ये नेऊन २४ वर्षीय युवकाचा ४० वर्षीय महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 17:35 IST

Rape Case : गर्भधारणा झाल्याने प्रकरण उघड : आराेपीस ठोकल्या बेड्या

ठळक मुद्देहरिष उत्तम किंदरणे रा. आंबेडकर वॉर्ड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वर्धा : जिनींग कंपनीत काम करणाऱ्या महिलेला शहरातील एका लॉजमध्ये नेऊन २४ वर्षीय युवकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने आर्वी शहरात एकच खळबळ उडाली. पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीस पोलिसांनीअटक केल्याची माहिती दिली. हरिष उत्तम किंदरणे रा. आंबेडकर वॉर्ड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडिता आणि आरोपी हे दोघेही आर्वी येथील एका जिनींगमध्ये कामावर होते. दोघांचीही एकमेकाशी ओळख झाली. पीडिता कामावर गेली असता आरोपी हरिषने तुला फिरायला नेतो, असे म्हणून दुचाकीवर बसवून शहरातील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच कॅनलमध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडिता ही आठ महिन्याची गर्भवती राहिल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. अखेर पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी हरिषविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

बदनामी करण्याची दिली धमकीपीडितेवर अत्याचार करुन तिला आरोपी हरिष याने समाजात बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र, पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उजेडात आला आणि पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक