शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा केला खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 21:13 IST

Encounter : मंगळवार म्हणजेच आज सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांमधली ही तिसरी चकमक असून त्यात आतापर्यंत 4 दहशतवादी ठार झाले आहेत.

दक्षिण काश्मीरच्या पुलमावा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक झाली. २४ तासांत ३ दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. पुलवामाच्या हकरीपोरा या परिसरात ही चकमक झाली होती. लष्कर-ए-तोयबाचेदहशतवादी या भागात लपून बसले असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.मंगळवार म्हणजेच आज सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात ३ एक-४७ रायफल्सचा समावेश आहे. सोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता. त्याच्या विरोधात मोठी मोहिम उघडली होती. त्याला दिवसभरातच यश मिळालं. गेल्या दोन दिवसांमधली ही तिसरी चकमक असून त्यात आतापर्यंत 4 दहशतवादी ठार झाले आहेत.

 

सकाळीच पोलिसांना या दहशतवाद्यांबद्दल लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, CRPF आणि SOG यांचं खास पथक बनवण्यात आले होते. त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास आवाहन केलं. मात्र, त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी त्या ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं.

टॅग्स :terroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाPoliceपोलिसSoldierसैनिक