शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 20:36 IST

रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती.

नवी मुंबई: पावणे येथे छापा टाकून पोलीसांनी बनावट हॅन्ड वॉश व जंतू नाशकांचा साठा जप्त केला आहे. त्याठिकाणी २३ लाख रुपये किमतीची बनावट उत्पादने आढळून आली आहेत. नामांकित कंपन्यांचे ट्रेडमार्क लावून या उत्पादनांची विक्री केली जात होती. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

पावणे एमआयडीसी मधील गामी इंडस्ट्रियल पार्क याठिकाणी बनावट उप्तादनाचा साठा असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी पथक केले होते. त्यात निरीक्षक सुनील कदम, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, हवालदार परशुराम मराडे, सोमनाथ वने, प्रताप यादव, संतोष बडे, दत्तू सांबरे, राजेश आघाव, सुनील सकट, दत्तात्रेय एडके आदींचा समावेश होता.

रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती. त्याद्वारे खात्री पटताच पथकाने एका गाळ्यावर छापा टाकला असता तिथे हात धुण्यासाठी वापरली जाणारी जंतू नाशके, हॅन्ड वॉश, एअर फ्रेशनर भांडी अथवा कपडे धुण्यासाठी वापरले जाणारी उत्पादने आढळून आली. त्यात गोदरेज, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर इंडिया व इतर अनेक कंपन्यांचे ट्रेडमार्क लावून तयार केलेल्या बनावट उत्पादनांचा समावेश होता.

हा सर्व साठा पोलीसांनी ताब्यात घेऊन संबंधित कंपन्यांमार्फत त्याची चाचपणी करण्यात आली. यावेळी सर्व उत्पादने बनावट असल्याची खात्री झाल्यानंतर गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. विनोद हिरजी डुबरीया (३२) असे त्याचे नाव असून तो अंधेरीचा राहणारा आहे. त्याच्याकडून तब्बल २६ लाख ४४ हजार रुपयांची बनावट उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये त्याच्या इतरही साथीदारांचा सहभाग असल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस