ऑनलाइन मसाज सर्व्हिस पडली २.२९ लाखात; सायबर ठाण्यात गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: February 15, 2024 12:31 IST2024-02-15T12:31:05+5:302024-02-15T12:31:15+5:30
व्हॉट्सॲप कॉलची भूरळ

ऑनलाइन मसाज सर्व्हिस पडली २.२९ लाखात; सायबर ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : ऑनलाइन मसाज सर्व्हिसच्या नावावर एका नोकरदाराला २ लाख २९ हजार ३४० रुपयांनी गंडविण्यात आले. घरपोच येऊन मसाज करून देण्यात येईल, असा व्हॉट्सॲप कॉल देखील करण्यात आला. त्याला भुलून त्या नोकरदाराने २.२९ लाख रुपये गमावले. ७ फेब्रुवारी रोजी ती घटना घडली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, जमील कॉलनी मनपा शाळेजवळीलरहिवासी नकीब अहेमद मुजीब अहेमद (४२) हे ऑनलाइन मसाज सर्व्हिसकरिता गुगलवर सर्च करीत होते. ती माहिती पाहत असताना त्यांना व्हॉट्सॲपहून एक कॉल आला. आरोपीने मोबाईल युजरने त्यांना ऑनलाइन मसाज सर्व्हिसबाबत अधिक माहिती देत सिक्युरिटी डिपॉझिट करावे लागेल, अशी बतावणी केली. त्यानंतर दोन मोबाईल युजरने त्यांना ऑनलाइन मसाज सर्व्हिस पुरविण्याच्या नावावर वेगवेगळी कारणे सांगून आपल्या खात्यात ऑनलाइन २ लाख २९ हजार ३४० रुपये पाठविण्यास भाग पाडले. रक्कम पाठविल्यावर आरोपी नॉट रिचेबल झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नकीब अहेमद यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.