शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:09 IST

पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली.

ठळक मुद्देवाधवानीला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली.नायरने कबूल केले की, तो एक डमी व्यक्ती आहे आणि व्यवसाय हाताळणारा पडद्यामागे वाधवानी आहे.

इंदौर - डायरेक्टोरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजेंसने (डीजीजीआय) २२५ कोटी रुपयांचा कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली इंदौरचा उद्योगपती किशोर वाधवानी याला मुंबईहूनअटक केली. पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईनेअटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली.वाधवानीला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली. डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला मुंबईहून इंदौर येथे आणले जात असल्याची माहिती केंद्रीय विभागाकडून मिळाली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, डीआयजीने आरोपीच्या नावाची खातरजमा केली नाही. तसेच विभागाने वाधवानीचा पाच दिवसांचा रिमांड घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात पकडलेला आरोपी विजय नायर याच्याकडून वाधवानीची माहिती मिळाल्यानंतर विभागाने त्यांना दोनदा समन्स बजावले होते.त्याच्याकडे एएए इंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे, जी विजय नायर चालवितो. विष्णू एजन्सी ही आणखी एक कंपनी अशोक डागा आणि अमित बोथरा चालवितात. हे दोघे  पान - मसाले आणि गुटखा तयार करतात आणि नायरला देतात. नायर मध्य प्रदेशसह महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि इतर शेजारच्या प्रदेशात हा माल विकतो. शंभर रुपयांपैकी केवळ २० रुपयांचा व्यवसाय पारदर्शक होतो, तर उर्वरित ८० टक्के व्यवसाय करचुकवेगिरी करून केला जातो. 

नायरने कबूल केले की, तो एक डमी व्यक्ती आहे आणि व्यवसाय हाताळणारा पडद्यामागे वाधवानी आहे. नायर यांच्या जबाबाची चौकशी करण्यासाठी आणि मास्टरमाईंडची पोल खोल करण्यासाठी वाधवानीची चौकशी केली जाणार आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

टॅग्स :ArrestअटकTaxकरMumbaiमुंबईDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय