शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 10:31 IST

आरोपी युवक पहाटे ५ च्या सुमारास मुलीच्या घरी घुसला, त्यानंतर मुलीवर चाकूने वार केले.

हुबळी - कर्नाटकात कॉलेज युवती नेहा हिरेमथ हत्येनंतर पुन्हा एकदा हुबळी इथं हादरवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून सनकी युवकानं २१ वर्षीय युवतीची हत्या केली आहे. आरोपी विश्वा उर्फ गिरिश सावंत हा पहाटे ५ वाजता अंजलीच्या घरी पोहचला. अंजलीनं दरवाजा उघडताच गिरीशनं चाकूने तिच्यावर वार केले. त्यानंतर तो पसार झाला. अंजलीच्या बहिणीच्या समोरच ही हत्या झाली त्यामुळे तीदेखील घाबरली. 

गिरिशला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक बनवलं आहे. या घटनेबाबत मृत अंजलीची बहीण म्हणाली की, गिरीश मागील काही काळापासून माझी बहीण अंजलीचा त्रास देत होता. त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली परंतु माझ्या बहिणीनं त्याला नकार दिला. त्याने अंजलीला म्हैसूरला येण्यासाठी दबाव टाकला होता. जर ती आली नाही तर तुझी अवस्था नेहासारखी करेन अशी धमकीही आरोपीने दिली. आम्ही पोलिसांना या धमकीबाबत सूचित केले, परंतु त्यांनी गांभीर्याने घेतले नाही आणि आज माझी बहिणीचा मृत्यू झाला. 

आरोपी युवक पहाटे ५ च्या सुमारास मुलीच्या घरी घुसला, त्यानंतर मुलीवर चाकूने वार केले. तितक्यात घरातील इतर सदस्य जागे झाले. त्याने युवकाला हल्ला करण्यापासून रोखले परंतु त्या निर्दयी युवकानं तोपर्यंत अंजलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपी युवक तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या पोलीस या युवकाचा शोध घेत असून त्यासाठी विविध पोलीस पथके तयार केलीत अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, आरोपी युवकावर चोरीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो बाईक चोर म्हणून कुप्रसिद्ध होता. आरोपी युवकाकडून अंजलीला सातत्याने त्रास दिला जायचा. त्याबाबत तिच्या कुटुंबानेही पोलिसांना संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले होते. पोलिसांनी या तक्रारींची फारशी दखल घेतली असा आरोप कुटुंबाने केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गिरीश ७ महिन्यापासून अंजलीला त्रास देत होता असं मृत युवतीच्या वडिलांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी