शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

VIDEO: वडील, आजोबांची हत्या करून तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 13:36 IST

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ; पोलिसांनी तिन्ही मृतदेह घेतले ताब्यात; तपास सुरू

मुंबई: वडील आणि आजोबांची हत्या करून २० वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडली आहे. शार्दुल मिलिंद मांगले असं तरुणाचं नाव आहे. शार्दुलनं वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्यानं वडील आणि आजोबांची हत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (20 year old commits suicide by killing father grandfather)मांगले यांच्या घरी वडील आणि आजोबांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर ठेवण्यात आला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास केअर टेकर वडिलांना चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेला असताना शार्दुलनं वडिलांवर चाकूनं सपासप वार केले. शार्दुलनं केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेले वडील ओरडले. जोराचा आवाज आल्यानं केअर टेकर किचनमधून बाहेर आला. तेव्हा शार्दुल त्याला वडिलांवर वार करताना दिसला. शार्दुलला पाहून केअर टेकर घाबरला. जखमी वडिलांनी पायऱ्यांवर धाव घेतली. शार्दुलनं त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पुन्हा वार केले. वडील मेल्याची खात्री पटल्यानंतर तो पुन्हा खोलीच्या दिशेनं आला. केअर टेकरनं  ८४ वर्षीय आजोबांना बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. मात्र ते आले नाहीत. खोलीत आलेल्या शार्दुलने त्यांचीही हत्या केली आणि त्यानंतर स्वतः इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. सोसायटीतील रहिवाशांनी घडलेल्या घटनेची माहिती तातडीनं मुलुंड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घरात वडील आणि आजोबांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.