शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात नोकरीच्या नावे २० लाख लाटले; उपसचिवांच्या सहीचे बनावट नियुक्ती आदेश; चार आराेपींवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 06:53 IST

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एकाची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. एवढेच नव्हेतर, तक्रारदारांचा विश्वास बसावा म्हणून भामट्यांनी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट सहीचे नियुक्ती आदेश त्यांना दाखवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार शिवडीचे राहणारे असून, त्यांच्या वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. तरुणाच्या वडिलांच्या मित्राने संदीप बंडू न्यारे याच्याशी त्यांची ओळख करून दिली होती. न्यारे हा मंत्रालयात नोकरी लावतो तसेच आरे दूध विक्री केंद्राचे स्टॉल तयार करून देतो. त्याचे स्वतःचेही स्टॉल आहेत, असे मित्राने सांगितल्याने तरुणाच्या वडिलांचा विश्वास बसला. बापूराव जाधव हा मंत्रालय कर्मचारी असून, तो मंत्रालयात नोकरी लावून देईल, असे न्यारेने त्यांना सांगितले. या प्रकरणी शिपाई सचिन डोळस रुग्णालयाचे खोटे कागदपत्रही दिले 

- वारंवार नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर न्यारे टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तक्रारदारांनी शिवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. - फसवणूक करणाऱ्या टोळक्याने वैद्यकीय तपासणी करण्याचे जे. जे. रुग्णालयाचे खोटे कागदपत्रही दिल्याचे समजते. - त्यानुसार पोलिसांनी न्यारे, जाधव, साठे आणि डोळस यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सर्वांना मंत्रालयात प्रवेश करून द्यायचा तसेच मंत्रालयाच्या बाहेर आणून सोडायचा. हा प्रकार २०२० पासून सुरू होता. न्यारे याने तक्रारदारासह पाच जणांकडून थोडे थोडे करत २० लाख रुपये घेतले होते. 

कोणत्या पदासाठी घेतले पैसे?मंत्रालयात महसूल व वन विभागात वाहन चालक तर कृषी व पदुम, उच्च व तंत्र शिक्षण विभागात कनिष्ठ सहायक पद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता अशा ५ पदांसाठी फिर्यादींकडून २० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. 

मंत्रालयात मुलाखत, नियुक्तिपत्रही दिलेतक्रारदाराच्या पत्नीसह त्याची बहीण आणि चुलत भावाची मंत्रालयाच्या कार्यालय क्रमांक ६२५ मध्ये सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर कार्यरत असलेल्या नितीन साठे या अधिकाऱ्याच्या समक्ष ४ सप्टेंबर, २०२० रोजी मुलाखत घेण्यात आली आणि त्यांना नियुक्तिपत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पदानुसार दरांची यादी आरोपी बापूराव जाधवने त्याचे ओळखपत्र दाखवत सर्वांना नोकरी लावेल, असे आश्वासन दिले. इतकेच नव्हेतर, कनिष्ठ सहायक पदापासून ते ड्रायव्हरची रेटलिस्टही दिल्याचे उघड झाले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस