शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शूज, पर्समधून २० काेटींचे कोकेन; दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या; एनसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:42 IST

एनसीबी मुंबईने या कारवाईत मरिंडा एस. आणि एच. मुसा नावाच्या दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या ठोकल्या. 

मुंबई :  शूज, पर्समधून २० कोटी किमतीच्या २.८०० किलो कोकेनच्या तस्करीचा डाव एनसीबीने उधळून लावला असून याप्रकरणी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या दोन परदेशी महिलांना बेड्या ठोकल्या. एनसीबी मुंबईने या कारवाईत मरिंडा एस. आणि एच. मुसा नावाच्या दोन परदेशी महिला तस्करांना बेड्या ठोकल्या. 

एनसीबी मुंबईचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळताच तपास सुरू केला. या ड्रग्ज रॅकेटमध्ये मरिंडा एस नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेबाबत माहिती एनसीबीला मिळाली. याच माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून रविवारी इथियोपिया येथून मुंबईत आलेल्या मरिंडा एस. हिला ताब्यात घेतले. दोन जोडी बूट आणि पर्समधील पोकळीमध्ये अशी एकूण ८ कोकेनची पाकिटे लपवून ठेवण्यात आली होती. मरिंडा एस हिला ताब्यात घेऊन एनसीबीने तिच्याकडे कसून चाैकशी केली असता तिने अंधेरीतील एका हाॅटेलमध्ये एका व्यक्तीला हे ड्रग्ज पोच करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, एनसीबीच्या दुसऱ्या पथकाने अंधेरीतील हाॅटेलमध्ये सापळा रचून एच. मुसा या नायजेरियन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत ती मरिंडाकडून माल घेण्यासाठी आली असल्याचे सांगितले. 

काेकेनचा प्रवास अमेरिका ते मुंबई -दक्षिण अमेरिकेतून हे कोकेन मुंबईत तस्करीसाठी आणण्यात आले होते. दोन्ही महिलांकडे त्यांचे स्थानिक ग्राहक आणि विदेशात असलेले पुरवठादार यांच्याबाबत चाैकशी सुरू असल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच, त्यांच्याकडील मोबाइलही पथकाने ताब्यात घेत अधिक  तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई