शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

2 वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; आरोपीचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 19:21 IST

नालासोपारा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे. 

ठळक मुद्दे शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सैय्यद यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हमजा सैय्यद हा त्यांचा 2 वर्षे 4 महिन्यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता.हमजाच्या गळ्यावर 10 ते 12 टाके पडले असून आता तो व्यवस्थित असल्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. 

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात शनिवारी संध्याकाळी एका इमारतीमध्ये राहणाऱ्या 2 वर्षे 4 महिन्याच्या मुलावर कोणीतरी चाकूच्या सहाय्याने धारधार हत्याराने गळ्यावर वार केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मुलावर जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून नालासोपारा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे. 

सोपारा गावातील नभा ऍव्हेन्यू इमारतीच्या रूम नंबर ए/02 मध्ये सैय्यद परिवार राहतात. शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सैय्यद यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हमजा सैय्यद हा त्यांचा 2 वर्षे 4 महिन्यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या मधील स्टेअर केसमध्ये गेला असता कोणीतरी त्याच्या गळ्यावर कसल्या तरी धारधार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या हमजाला जवळच्या बदर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवले आहे. हमजाच्या गळ्यावर 10 ते 12 टाके पडले असून आता तो व्यवस्थित असल्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक यांनी लोकमतला बोलताना सांगितले आहे. 

 सोपारा गावातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या 2 वर्षे 4 महिन्याच्या मुलावर कोणीतरी धारदार हत्याराने गळ्यावर वार केले आहे. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून हा हल्ला कोणी व का केला याचा तपास करत आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस