शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:04 IST

राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर ज्योतिषाने केलेली २ भविष्यवाणी चर्चेत आहे जी आता खरी होताना दिसते.

इंदूर - राजा रघुवंशीने जर पंडिताचे ऐकले असते आणि शुभ मुहूर्तावर हनीमूनला गेला असता तर कदाचित तो आज जिवंत असता अशी चर्चा लोकांमध्ये आहे. सोनमच्या विदाईसाठी पंडितने ५ जूनची तारीख दिली होती. परंतु त्याआधीच ते हनीमूनला निघून गेले. राजाचा प्लॅन आसाम येथे जात कामाख्या देवीचे दर्शन करण्याचा होता परंतु सोनम रघुवंशीने मेघालयचा प्लॅन बनवला आणि दोघेही शिलांगला पोहचले.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर ज्योतिषाने केलेली २ भविष्यवाणी चर्चेत आहे जी आता खरी होताना दिसते. लग्नानंतर दीड महिने घर सोडू नका असा सल्ला ज्योतिषाने दिल्याचा खुलासा सोनम रघुवंशीच्या वडिलांनी केला. सोनमच्या विदाईसाठी ५ जून तारीख दिली होती तोपर्यंत तिला माहेरीच राहायचे होते. २१ मे रोजी कामाख्या देवीचे दर्शन करण्यासाठी ते आसामला गेल्याचे वडिलांनी सांगितले. ज्योतिषाने २ भविष्यवाणी केली होती, ज्यात हनीमूनला धोक्याची शक्यता आणि मुलीच्या परतण्यासाठी जादूटोण्याचा वापर यांचा समावेश होता.

मेट्रोमोनियल साईटवरून जुळलं नाते

सोनमने मेट्रोमोनियल साईटवरून राजाला शोधले. ज्योतिषी एनके पांडे यांनी सोनम आणि राजाची कुंडली पाहिली. दोघेही मांगलिक होते. आधी लग्नाची तारीख १६ मे काढण्यात आली. या दोघांना दिवाळीनंतर लग्न करायचे होते परंतु राजाच्या वडिलांनी इतके दिवस थांबण्यास नकार देत ११ मे रोजी लग्न करण्याचं ठरवले. त्यानंतर ज्योतिषाने ३१ मे पर्यंत सोनमची विदाई करू नका असं सांगितले. ३१ मे रोजी दुपारी अथवा संध्याकाळी तिची पाठवणी करण्याची वेळ सांगितली. तोपर्यंत सोनमला तिच्या माहेरीच राहायचा सल्ला दिला परंतु लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सोनमची पाठवणी करण्यात आली. 

ज्योतिषाचे न ऐकल्यानं हे घडलं...सोनमचे वडील बोलले

ज्योतिषाचे न ऐकल्याने हे सर्व घडले असं सोनमच्या वडिलांनी सांगत राजा रघुवंशीच्या हत्येत सोनमचा हात असल्याचा आरोप फेटाळला. त्यांनी मेघालय पोलीस खोटे बोलत असल्याचे देवी सिंह म्हणाले. मेघालय पोलिसांनी राजाच्या हत्येत प्रेमाचा त्रिकोण असल्याची शक्यता वर्तवत राज कुशवाह यालाही अटक केली आहे. राज कुशवाहसोबत सोनमचं अफेअर असल्याचे बोलले जाते. राज या संपूर्ण घटनेचा मास्टरमाईंड असून तो सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीत काम करत होता. तिथे मॅनेजर असताना राज आणि सोनमची ओळख झाली होती.

उलटा फोटो टांगल्यानंतर सोनम परतली

राजा रघुवंशीचा मृतदेह २ जूनला मिळाल्यानंतर सोनम बेपत्ता होती. तेव्हा तिचे वडील देवी सिंह यांनी पुन्हा ज्योतिषाचा दरवाजा ठोठावला. तेव्हा ज्योतिषाने उपाय म्हणून घराबाहेर सोनमचा उलटा फोटो लटकवण्याचा सल्ला दिला मग ती घरी येईल असं सांगितले. ज्योतिषाच्या सांगण्याप्रमाणे देवी सिंह यांनी घराबाहेर उलटा फोटो लटकवला आणि २ दिवसांनीच सोनम परतली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी